मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय शेअर बाजाराने आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स मिळवून दिले आहेत. चांगले रिटर्न्स मिळवून देणाऱ्या कंपन्यांमध्ये काही वाहन उत्पादक कंपन्यांचाही समावेश आहे. ऑटो-रिक्षा आणि ई-रिक्षा यांसारख्या तीनचाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या अतुल ऑटोच्या स्टॉकने या महिन्यात जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर ज्या गुंतवणूकदारांनी हा शेअर दीर्घ काळ जपून ठेवला आहे, ते मालामाल झाले आहेत. या कंपनीच्या शेअरमध्ये 50 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करूनही गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत. 13 ऑक्टोबर रोजी अतुल ऑटोच्या शेअर मध्ये बीएसईवर चार टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली. हा शेअर 259.10 रुपयांवर बंद झाला. विशेष बाब म्हणजे सध्या हा शेअर वर्षभरातल्या विक्रमी उच्चांकासह ट्रेड करत आहे.
सौरभ मुखर्जींना कोणत्या शेअर्सवर भरोसा? मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी दिला गुरू मंत्र20 वर्षांपूर्वी एका शेअरची किंमत होती फक्त 1.13 रुपये अतुल ऑटो या ऑटो रिक्षा निर्माती कंपनीचं मार्केट कॅप सुमारे 568.55 कोटी रुपये इतके आहे. सुमारे 20 वर्षांपूर्वी म्हणजे 2002 मध्ये अतुल ऑटोच्या एका शेअरची किंमत 1.13 रुपये होती. दोन दशकांपेक्षा कमी कालावधीत या शेअरची किंमत जवळपास 229 पटींनी वाढून 259.10 रुपये इतकी झाली आहे. त्या वेळी एखाद्या गुंतवणूकदारानं अतुल ऑटोच्या शेअर्समध्ये 44 हजार रुपये गुंतवले असतील, तर त्याच्या गुंतवणुकीचं मूल्य आता एक कोटी रुपयांहून अधिक झालं आहे.
शेअर मार्केटची दमदार सुरुवात, बाजार उघडताच ऐतिहासीक तेजी, तुमच्यावर कसा होणार परिणाम?या वर्षी स्टॉकमध्ये झाली मोठी वाढ अतुल ऑटोचा स्टॉक 4 नोव्हेंबर 2021 रोजी 270 रुपयांवर पोहचला होता. हा त्याचा एका वर्षातला विक्रमी उच्चांक होता; मात्र दरम्यानच्या काळात झालेल्या घसरणीमुळे या वर्षी 21 जून रोजी हा शेअर 145.10 रुपयांपर्यंत खाली आला; पण यात हळूहळू वाढ होत असून, आतापर्यंतच्या नीचांकाच्या सुमारे 78.56 टक्के वर आला आहे.
अतुल ऑटोचा व्यवसाय 1970 मध्ये सुरू झाला. सध्या कंपनीनं बनवलेली दहा लाखांहून अधिक तीन चाकी वाहनं जगभरातल्या रस्त्यावर धावत आहेत. अतुल ऑटो डिझेल, पेट्रोल, सीएनजी, एलपीजी आणि इलेक्ट्रिक अशा प्रकारात तीन चाकी वाहनांचं उत्पादन आणि विक्री करते. अतुल ऑटोचा इतिहास आणि सध्याची स्थिती पाहता, भविष्यातल्या गुंतवणुकीसाठी ही कंपनी एक चांगला पर्याय ठरू शकते.