मुंबई, 25 फेब्रुवारी : अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझच्या (Apollo Hospitals Enterprise) शेअर्समध्ये 25 फेब्रुवारीच्या आजच्या व्यवसायात जोरदार वाढ झाली आहे. सकाळी 11.40 च्या सुमारास, हा स्टॉक NSE वर 329.05 रुपये किंवा 7.5 टक्क्यांच्या वाढीसह 4711.00 च्या पातळीच्या आसपास दिसत होता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने म्हटले आहे की 31 मार्चपासून अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्रायझेस स्टॉक निफ्टी 50 इंडेक्समध्ये समाविष्ट केला जाईल. निफ्टी 50 इंडेक्समध्ये समाविष्ट होणारी अपोलो हॉस्पिटल्स ही पहिली हेल्थकेअर कंपनी असेल. अपोलो हॉस्पिटल्स निफ्टी 50 इंडेक्समध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची जागा घेतील. Emergency Fund : संकटकाळात कमी वेळेत पैसे कसे जमवायचे? काय आहेत विविध पर्याय? यावर ब्रोकरेज फर्म एडलवाइज सिक्युरिटीजचे (Edelweiss Securities) म्हणणे आहे की निफ्टी 50 इंडेक्समध्ये अपोलो हॉस्पिटलचा समावेश केल्यास एक्सचेंज ट्रेडेड फंडातून 14.3 कोटी डॉलर निधी प्राप्त होईल. डीलर्सचे म्हणणे आहे की निफ्टी 50 मध्ये सामील होण्यापूर्वी, ट्रेडर्स या स्टॉकमध्ये खरेदी करु शकतात. हा शेअर गेल्या काही काळापासून दबावाखाली आहे. शेअर 3 महिन्यांत जवळपास 23 टक्क्यांनी घसरला आहे आणि 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 26 टक्क्यांनी खाली दिसत आहे. Russia-Ukraine Crises: शेअर बाजारात घसरणीदरम्यान खरेदीचा विचार करताय? तज्ज्ञांच्या मते अशी रणनिती ठरवा आजच्या ट्रेडिंगमध्ये म्हणजेच 25 फेब्रुवारीच्या ट्रेडिंगमध्ये अपोलो हॉस्पिटल्सचा स्टॉक 4,570.00 च्या पातळीवर उघडला गेला होता, तर 24 फेब्रुवारीच्या ट्रेडिंगमध्ये म्हणजेच गुरुवारी हा स्टॉक 4,381.95 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5,935.40 रुपये आहे तर 52 आठवड्यांचा नीचांक 2,787.50 रुपये आहे. स्टॉकचे मार्केट कॅप 68,059 कोटी रुपये आहे. काल आलेल्या इतिहासातील पाचव्या मोठ्या घसरणीतून सावरत शेअर बाजाराने शुक्रवारी जोरदार पुनरागमन केले. बाजार उघडताच सेन्सेक्सने 55 हजारांची पातळी ओलांडली आणि व्यवहाराच्या दोन तासांत 56 हजारांच्या वर पोहोचला. सुरुवातीच्या सत्रातच सेन्सेक्स 792 अंकांनी वाढून 55,322 वर उघडला आणि निफ्टीही 268 अंकांच्या मजबूत उसळीसह 16,515.65 वर उघडला. गुंतवणूकदारांनी आज जोरदारपणे शेअर्स खरेदी केले आणि सकाळी 9.30 वाजता सेन्सेक्स 1,152 अंकांच्या वाढीसह 55,678 वर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे निफ्टीही 357 अंकांनी वाढून 16,604 वर पोहोचला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.