• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gainers & Losers: बँक निफ्टीने गाठला विक्रमी उच्चांक; सर्वाधिक चढउतार झालेले शेअर्स

Gainers & Losers: बँक निफ्टीने गाठला विक्रमी उच्चांक; सर्वाधिक चढउतार झालेले शेअर्स

Bank Nifty ने आज विक्रमी उच्चांक गाठला. शेअर बाजार (Share Market Update) संपल्यावर निफ्टी आज 10.50 अंक किंवा 0.06 टक्क्यांच्या वाढीसह 18,125.40 वर बंद झाला.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : गेल्या चार दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर शेअर बाजार आज हिरव्या रंगात बंद झाला. आजच्या बाजारातील तेजीमध्ये बँकिंग शेअर्सचे सर्वाधिक योगदान राहिले. बँक निफ्टीनेही आज विक्रमी उच्चांक गाठला. शेअर बाजार संपल्यावर निफ्टी आज 10.50 अंक किंवा 0.06 टक्क्यांच्या वाढीसह 18,125.40 वर बंद झाला. तर सेन्सेक्स 145.43 अंक किंवा 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 60,967.05 वर बंद झाला. ICICI Bank | CMP: 846.75 रुपये दुसऱ्या तिमाहीच्या मजबूत निकालांच्या पार्श्वभूमीवर आज शेअरमध्ये मजबूत वाढ झाली आहे. 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत ICICI बँकेचा निव्वळ नफा 30 टक्क्यांनी वाढून 5511 कोटी रुपये झाला. या दरम्यान बँकेला प्रोविजनिंग कमी करावी लागली, ज्यामुळे नफ्यात वाढ झाली आहे. सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत आयसीआयसीआय बँकेची प्रोविजनिंग 9 टक्क्यांनी घटून 2714 कोटी रुपयांवर आली. तर एका वर्षापूर्वी याच तिमाहीत प्रोविजनिंग 2995 कोटी रुपये होती. Colgate Palmolive | CMP: 1534.90 रुपये आज या शेअरमध्ये सुमारे 1 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 269.2 कोटी रुपये होता. अंदाज 285 कोटी रुपये होता. उत्पन्न 1,352.4 कोटी रुपये झाले आहे. तर 1,368 कोटी रुपये असा अंदाज होता. Rakesh Jhunjhunwala यांची 'या' रियल्टी स्टॉकमध्ये गुंतवणूक, वर्षभरात 225 टक्क्यांचे रिटर्न्स Tech Mahindra | CMP: 1,531 रुपये दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा 26 टक्क्यांनी वाढून 1338 कोटी रुपये झाला, जो गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत 1064 कोटी रुपये होता. कंपनीचा नफा अंदाजे 1,357 कोटी रुपये होता. तिमाही आधारावर, याच आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीला 1,357 कोटी रुपयांचा नफा झाला. Dwarikesh Sugar | CMP: 74.50 रुपये मजबूत निकालांच्या पार्श्वभूमीवर, आज स्टॉक 3 टक्क्यांहून अधिक वधारला. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 18 कोटींवरून 40 कोटींवर पोहोचला आहे. तसेच उत्पन्न 419 कोटी रुपयांवरून 506 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर EBITDA 46 कोटींहून 69 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे आणि EBITDA मार्जिन 11 टक्क्यांवरून 13.6 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. GMDC | CMP: 75.25 रुपये चांगल्या निकालांनंतर, आज हा स्टॉक देखील सुमारे 3 टक्क्यांनी वाढला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 119.5 कोटी रुपयांवरून 404.5 कोटी रुपये झाला. त्याच वेळी, उत्पन्न 235.6 कोटींवरून 486.6 कोटी झाले आहे. EBITDA 29.6 कोटींवरून 61.2 कोटींवर पोहोचले आहे. 'या' शेअरमधून गुंतवणूकदारांना वर्षभरात 168 टक्के रिटर्न्स, अजूनही गुंतवणुकीची संधी Newgen Software | CMP: 596.35 रुपये दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 21.6 कोटी रुपयांवरून 37.4 कोटी रुपयांपर्यंत वाढला आणि उत्पन्न 159.5 कोटी रुपयांवरून 185.5 कोटी रुपयांपर्यंत वाढले. तर EBITDA मार्जिन 14.3 टक्क्यांवरून वाढून 25.2 टक्के झाले आहे. Gland Pharma | CMP: 3735 रुपये आज हा स्टॉक देखील मजबूत निकालांच्या आधारे 1 टक्क्यांहून अधिक वधारला. कंपनीने सांगितले की त्यांचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स (PAT) सप्टेंबर तिमाहीत 38 टक्क्यांनी वाढून 302.1 कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 218.9 कोटी रुपये होता. सप्टेंबर तिमाहीसाठी कंपनीचा महसूल 30 टक्क्यांनी 1,080.5 कोटी रुपये झाला, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 831.5 कोटी रुपये होता. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 33 टक्क्यांनी वाढून 1131.7 कोटी झाले आहे. जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 851.9 कोटी होते. Coforge | CMP: 5065.65 रुपये दुसर्‍या तिमाहीचे चांगले निकाल असूनही, आज शेअर 5 टक्क्यांनी खाली आला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा तिमाही आधारावर 18.7 टक्क्यांनी वाढला. तर तिमाही आधारावर कमाईमध्ये 7.4 टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या बोर्डाने 13 रुपये प्रति शेअरचा अंतरिम डेविडंटही जाहीर केला आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: