मुंबई : आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी आज भारतातील शेअर मार्केट सुरुवातीलाच तेजीच उघडल्याचं दिसत आहे. अनेक आठवड्यांनंतर आज बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. बऱ्याच दिवसांनंतर आज भारतीय शेअर मार्केटची दमदार सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगले संकेत मिळत आहेत. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी भारतातील शेअर बाजारा ची सुरुवात दमदार झाली.
#MarketOpening | #StockMarket | भारतीय बाजारों की दमदार शुरुआत | @_anujsinghal @virendraonNifty @CNBC_Awaaz #AwaazMarkets #Sensex #Nifty #NiftyBank #MunafeKiBaat #StockMarket #MarketOpen #StockMarketindia pic.twitter.com/Y0wMPL92Yg
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) October 14, 2022
चारही बाजूने तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 1 हजार अंकांनी वधारला, निफ्टी17,300 च्या वर गेल्याचं पाहायला मिळत आहे. बाजार उघडताच तेजी पाहायला मिळाली आहे. बँक, ऑटो, आयटी, मेटलसह सर्वच क्षेत्रात जबरदस्त वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं. निफ्टी बँक निर्देशांकात 2.22%, निफ्टी आयटीमध्ये 2.24% वाढ झाली आहे.
Moonlighting : कंपनीला कसं कळतं की, त्यांचा कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी देखील काम करतोय?सेन्सेक्स 1087 अंकांनी वधारून 58,322 अंकांवर उघडला. त्याचवेळी निफ्टी 308 अंकांच्या वाढीसह 17322 च्या पातळीवर सुरू झाला. चांगल्या Q2 च्या निकालानंतर इन्फोसिसला प्रचंड फायदा झाला आहे. व्यवसायादरम्यान हा शेअर तब्बल 4 टक्क्यांनी वाढला. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील शेअर बाजारात सातत्याने घसरण झाल्यानंतर आज अमेरिकी शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. एस अँड पीमध्ये 2.60 टक्के वाढ झाली आहे. नॅसडॅक 2.23 टक्क्यांनी वाढून 10,649 वर पोहोचली आहे. दुसरीकडे, युरोपमधील प्रमुख शेअर बाजारांपैकी एक असलेल्या जर्मनीच्या शेअर बाजार डीएएक्सचा व्यवहार सकाळी 7:30 पर्यंत 1.51 टक्क्यांनी वधारला होता, फ्रान्सचा शेअर बाजार सीएसी 1.04 टक्क्यांनी वधारला होता, तर लंडनचा शेअर बाजार एफटीएसई 0.35 टक्क्यांनी वधारला होता.
भाडेकरार पूर्ण वर्षाऐवजी फक्त 11 महिन्यांचाच का? कारण आणि कायदेशीर परिणाम#MarketOpening | #AwaazMarkets जानिए कैसी रही मार्केट की ओपनिंग @_anujsinghal के साथ | @virendraonNifty | @AEHarshada | @CNBC_Awaaz | #MunafeKiBaat #StockMarketindia #StockMarket #NSE #BSE #MarketOpening pic.twitter.com/6WVP1oZF8c
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) October 14, 2022
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पुन्हा मार्केट घसरण्याची शक्यता आहे. 16,750 पर्यंत पुन्हा घसरण होईल. आज बाजार स्थिर राहातो का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. उघडताना तेजी आहे मात्र आता ६ सत्रात कोणते बदल होतात याकडे देखील लक्ष असणार आहे.