जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Share Market Tips: शेअर बाजारात गुंतवणूक करताना 'ही' चूक करु नका, नाहीतर कष्टाची कमाई होऊ शकते क्षणात गायब

Share Market Tips: शेअर बाजारात गुंतवणूक करताना 'ही' चूक करु नका, नाहीतर कष्टाची कमाई होऊ शकते क्षणात गायब

Share Market Tips: शेअर बाजारात गुंतवणूक करताना 'ही' चूक करु नका, नाहीतर कष्टाची कमाई होऊ शकते क्षणात गायब

झीरोधाच्या म्हणण्यानुसार, पंप आणि डंम घोटाळ्यात, बहुतेक होल्डिंग ऑपरेटर SMS, सोशल मीडियाद्वारे पसरवून किंमती वाढवतात आणि नंतर किंमती वाढल्यावर त्यांचे शेअर्स विकतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 एप्रिल : शेअर बाजारात नव्याने गुंतवणूक (Share Market Investors) करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे रातोरात करोडपती होण्याचे स्वप्न असते. पण या हव्यासापोटी ते कष्टाची कमाई गमावतात. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी कोणती चूक टाळावी, याबाबत ऑनलाइन ब्रोकरेज फर्म झीरोधाने (Zerodha) दिला आहे. पंप आणि डंप (Pump and Dump) हा बाजारातील गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा सर्वात जुना घोटाळा आहे. झीरोधाने म्हटलं की, काही प्रकरणांमध्ये तपास केला जात असला तरी बहुतांश प्रकरणे उघडकीस येत नाहीत. ऑनलाइन ब्रोकिंग एजन्सी झीरोधाने सांगितले की, गुंतवणूकदारांना याबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. एजन्सीने अशा फसवणूक टाळण्यासाठी कसे सतर्क राहता येईल हे देखील स्पष्ट केले. झीरोधाच्या म्हणण्यानुसार, पंप आणि डंम घोटाळ्यात, बहुतेक होल्डिंग ऑपरेटर SMS, सोशल मीडियाद्वारे पसरवून किंमती वाढवतात आणि नंतर किंमती वाढल्यावर त्यांचे शेअर्स विकतात. Multibagger Share: चार महिन्यात 2 रुपयांचा शेअर 102 रुपयांवर, एक लाखांची गुंतवणूक बनली 35 लाख SMS, टेलीग्राम आणि व्हॉट्सअॅप हे अशा प्रकारच्या स्टॉक टिप्स पसरवण्याचे सर्वात लोकप्रिय माध्यम आहेत. मात्र, आता सोशल मीडिया (Social Media) आणि यूट्यूबवर प्रचंड फॉलोअर्स असलेल्या लोकांना ट्वीट आणि व्हिडीओंद्वारे स्टॉकचा प्रचार करण्यासाठी पैसे दिले जात आहेत. गेल्या काही महिन्यांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यांनी माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र अनेकजण चर्चेत येऊ शकले नाहीत. गुंतवणूकदार कसे अडकतात? तुम्हालाही असे अनेक फोन आले असतील जे टिप्स देऊन श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवतात. अशा परिस्थितीत, नवे गुंतवणूकदार, नकळत किंवा लालसेपोटी या टिप्सच्या जाळ्यात सापडतात. जेव्हा स्टॉक अपर सर्किट झाला तेव्हा त्यांनी पैसे गुंतवले, परंतु ऑपरेटर बाहेर आल्यावर ते अडकले. काही प्रकरणांमध्ये, स्टॉक 90 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. हा एक अतिशय प्रसिद्ध घोटाळा आहे, तरीही लोक त्यात अडकतात. फसवणूक टाळायची असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा सर्वप्रथम, ट्विटर, यूट्यूब, व्हॉट्सअॅप इत्यादींवर मिळणाऱ्या टिप्सवर ताबडतोब स्टॉकची विक्री किंवा खरेदी करू नका. तुम्ही तुमच्या मेहनतीचे पैसे देत आहात. शेअर बाजारात लवकर श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग नाही. जर काहीतरी खरोखर चांगले असेल तर ते नेहमीच चांगले असेल. तुमचं ‘या’ बँकांमध्ये खातं असेल तर 27 एप्रिलला होईल 5 लाखांपर्यंत फायदा; कसं ते वाचा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नवीन असाल तर मार्केट तुम्हाला घाबरवू शकते. पण तुम्ही माहितीसह शहाणपणाने गुंतवणूक केल्यास गोष्टी सोप्या होऊ शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल तर थेट शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याऐवजी म्युच्युअल फंड किंवा ईटीएफपासून सुरुवात करा. तुम्ही शिकण्यासाठी थोडा वेळ काढू शकता, तुमच्यासाठी काय उपयुक्त आहे ते पहा आणि मगच गुंतवणूक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात