जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुमचं 'या' बँकांमध्ये खातं असेल तर 27 एप्रिलला होईल 5 लाखांपर्यंत फायदा; कसं ते वाचा

तुमचं 'या' बँकांमध्ये खातं असेल तर 27 एप्रिलला होईल 5 लाखांपर्यंत फायदा; कसं ते वाचा

गुंतवणूक करून व्हा लखपती. (प्रतीकात्मक फोटो)

गुंतवणूक करून व्हा लखपती. (प्रतीकात्मक फोटो)

RBI ची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेली DICGC बँक, ठेवींवर 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देते. डीआयसीजीसीने नोटीसमध्ये म्हटले आहे की दोन्ही सहकारी बँकांच्या ठेवीदारांना वैध कागदपत्रे सादर केल्यावर विम्याची रक्कम निर्दिष्ट पर्यायी बँक खात्यात दिली जाईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 एप्रिल : ठेव विमा आणि कर्ज हमी महामंडळ (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation- DICGC) 27 एप्रिल रोजी लखनौस्थित सहकारी बँक इंडियन मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पात्र ठेवीदारांना पेमेंट करेल. त्याच बरोबर बीड येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना (Bank Account Holders) 6 जून रोजी पैसे दिले जाणार आहेत. एबीपी न्यूज हिंदी ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार RBI ची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेली DICGC बँक, ठेवींवर 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देते. डीआयसीजीसीने नोटीसमध्ये म्हटले आहे की दोन्ही सहकारी बँकांच्या ठेवीदारांना वैध कागदपत्रे सादर केल्यावर विम्याची रक्कम निर्दिष्ट पर्यायी बँक खात्यात (specified alternative bank account) दिली जाईल. Multibagger Share: चार महिन्यात 2 रुपयांचा शेअर 102 रुपयांवर, एक लाखांची गुंतवणूक बनली 35 लाख 8 सहकारी बँकांचे क्लेम निकाली काढले जातील 2021-22 या आर्थिक वर्षात DICGC ने आठ सहकारी बँकांचे क्लेम निकाली काढले होते. यामध्ये गोव्यातील मडगाम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 32,221 ठेवीदारांकडून सुमारे 136 कोटी रुपये, महाराष्ट्रस्थित कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या 38,325 ठेवीदारांकडून 374 कोटी रुपयांचा समावेश आहे. कराड जनता सहकारी बँकेच्या 39,032 ठेवीदारांनाही 330 कोटी रुपये देण्यात आले. Investment Tips: PPF अकाऊंट एक फायदे अनेक; चांगला परतावा, कर्ज, टॅक्स बचत आणि बरंच काही… तुम्हाला किती कव्हर मिळतो? याआधी डीआयसीजीसी कायद्याच्या कलम 16(1) अंतर्गत, ठेवीदाराला केवळ 1,500 रुपयांचे विमा संरक्षण मिळत असे, परंतु गेल्या तीन दशकांमध्ये विम्याची ही रक्कम हळूहळू वाढत गेली. यावर्षी 4 फेब्रुवारीपासून ठेवींवरील विमा संरक्षण 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात