मुंबई, 15 मार्च : पेटीएमच्या स्टॉकसाठी (Paytm Share) आजचा दिवसही खराब ठरला. आज शेअर प्रथमच 600 रुपयांच्या खाली घसरला आणि राष्ट्रीय शेअर बाजारावर 592.45 वर बंद झाला. पेटीएमचा स्टॉक इतका खाली जाईल असे क्वचितच कोणत्याही गुंतवणूकदाराला वाटले असेल. डिजिटल पेमेंट (Digital Payment) फर्म पेटीएमची मूळ कंपनी One97 Communications चे शेअर्स मंगळवारी 12 टक्क्यांहून अधिक घसरले. आत्तापर्यंतच्या घसरणीबद्दल बोलायचे तर गुंतवणूकदारांचं यात मोठं नुकसान झालं आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर 1955 रुपयांना लिस्टिंग असलेला शेअर सध्या 592 रुपयांवर आहे. दररोज तो आपली नवीन निम्न पातळी बनवत आहे. व्यवसायावर परिणाम होणार नाही- पेटीएम पेटीएम शेअर्समध्ये सतत विक्रीचा दबाव आहे. अशा वेळी येतो जेव्हा आरबीआयने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेला (Paytm Payments Bank) नवीन ग्राहक स्वीकारण्यास मनाई केली आहे. बँकिंग नियामकाने त्यांच्या IT सिस्टमचे सर्वसमावेशक ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. RBI ने, One97 कम्युनिकेशन्सच्या पेमेंट बँकेत आढळलेल्या Supervisory Concerns चा विस्तार न करता उल्लेख केला. Income Tax Alert : सोन्यातील गुंतवणुकीवर कर कसा आकारला जातो? डिटेल्स चेक करा पेटीएमने म्हटले आहे की कंपनी आयटी ऑडिटरच्या नियुक्तीसह आरबीआयच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी त्वरित पावले उचलत आहे. डिजिटल पेमेंट कंपनीला विश्वास आहे की या बंदीमुळे तिच्या एकूण व्यवसायावर कोणताही विशेष परिणाम होणार नाही. Senior Citizen Saving Scheme : 31 मार्च आधी बचत खाते लिंक करा, अन्यथा रोख व्याज मिळणार नाही अनेक तज्ज्ञ पेटीएम सारख्या नवीन युगातील व्यवसायांच्या वाढीच्या संभाव्यतेबद्दल साशंक आहेत. एलिक्सिर इक्विटीजचे संचालक दीपन मेहता यांनी CNBC-TV18 ला सांगितले की पेटीएमसाठी नफा मिळवण्याच्या मार्गावर ते फारसे स्पष्ट नाहीत. जानेवारीमध्ये, बाजारातील दिग्गज शंकर शर्मा यांनी CNBC-TV18 ला सांगितले की 2022 च्या अखेरीस नवीन-युगातील कंपन्यांचे शेअर्स 80-90 टक्क्यांनी घसरल्यास आश्चर्य वाटू नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.