Income Tax Alert : सोन्यातील गुंतवणुकीवर कर कसा आकारला जातो? डिटेल्स चेक करा
Income Tax Alert : सोन्यातील गुंतवणुकीवर कर कसा आकारला जातो? डिटेल्स चेक करा
करदात्यांना सोन्यात गुंतवणूक करण्याच्या पद्धतीनुसार कर भरावा लागतो. गोल्ड बॉण्डद्वारे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांवर प्रत्यक्ष सोने खरेदी करणाऱ्यांपेक्षा वेगळे कर दायित्व (Tax on Gold Investment) असेल.
मुंबई, 15 मार्च : तुम्ही अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नसेल, तर 31 मार्च 2022 ही शेवटची तारीख आहे. या कालावधीपर्यंत तुम्ही दंडासह विवरणपत्र दाखल करू शकता. रिटर्न भरताना, तुम्हाला तुमच्या कमाईपासून गुंतवणुकीपर्यंतची (Investments) सर्व माहिती द्यावी लागेल. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) केली असेल तर ITR भरताना ते देखील उघड करावे लागेल.
कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, करदात्यांना सोन्यात गुंतवणूक करण्याच्या पद्धतीनुसार कर भरावा लागतो. गोल्ड बॉण्डद्वारे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांवर प्रत्यक्ष सोने खरेदी करणाऱ्यांपेक्षा वेगळे कर दायित्व (Tax on Gold Investment) असेल.
फिजिकल गोल्ड : कॅपिटल गेननुसार टॅक्स
फिजिकल गोल्ड गुंतवणूक केल्यापासून 36 महिन्यांच्या आत त्याची विक्री केल्यास स्लॅब-आधारित शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कर आकारला जातो. सोन्याच्या विक्रीतून मिळणारा परतावा गुंतवणूकदाराच्या वार्षिक कमाईमध्ये जोडला जातो. तीन वर्षांनंतर सोने विकले गेले तर ते दीर्घकालीन भांडवली नफा मानले जाईल. यामध्ये विक्रीतून मिळालेल्या रकमेच्या आधारे कर निश्चित केला जाईल. यावर एकूण मूल्यांकनाच्या 20 टक्के कर भरावा लागेल. याशिवाय कराच्या रकमेच्या चार टक्के उपकरही लावला जातो.
Gold Loan : BharatPe ची व्यापाऱ्यांसाठी गोल्ड लोन सेवा, 20 लाखांपर्यंत कर्जाची सुविधाडिजिटल गोल्ड: 20 टक्के कर भरावा लागेल
डिजिटल गोल्ड हा सोन्यात गुंतवणुकीचा एक नवीन मार्ग आहे, जो दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. वेगवेगळ्या वॉलेट्स आणि बँक अॅप्सच्या माध्यमातून यामध्ये गुंतवणूक करणे शक्य आहे. डिजिटल गोल्डमध्ये किमान एक रुपयाची गुंतवणूक करता येते. त्यात परताव्यावर 20 टक्के कर आणि दीर्घकालीन कॅपिटल गेनवर 4 टक्के सेस आणि सर चार्ज लागू होतो. 36 महिन्यांपेक्षा कमी काळ डिजिटल सोने ठेवल्याच्या परताव्यावर थेट कर आकारला जात नाही.
गोल्ड ईटीएफ: करासह उपकर देखील भरावा लागेल
गोल्ड म्युच्युअल फंड आणि गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ETF) द्वारे देखील सोन्यात गुंतवणूक करता येते. यामध्ये सोने फिजिकल स्वरूपात नसून व्हर्च्युअल स्वरूपात आहे. दोन्हीवर फिजिकल गोल्ड प्रमाणे समान दराने कर आकारला जातो. गोल्ड म्युच्युअल फंड किंवा ईटीएफद्वारे सोन्यात गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन भांडवली नफ्यासाठी 4 टक्के उपकरासह 20 टक्के कर लागतो.
Senior Citizen Saving Scheme : 31 मार्च आधी बचत खाते लिंक करा, अन्यथा रोख व्याज मिळणार नाहीसॉवरेन गोल्ड बॉन्ड : स्लॅबनुसार कर भरावा लागेल
सॉवरेन गोल्ड बाँड्स (SGBs) वरील गुंतवणूकदारांना वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळते, ज्यावर स्लॅबनुसार कर आकारला जातो. SGB मध्ये 8 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर, गुंतवणूकदाराचा परतावा पूर्णपणे करमुक्त असेल. जर होल्डिंग 5 वर्षांनंतर आणि कोणत्याही वेळी मॅच्युरिटी होण्यापूर्वी विकले गेले तर, 20 टक्के दीर्घकालीन भांडवली नफा कर आणि 4 टक्के उपकर देखील आकारला जातो.
Published by:Pravin Wakchoure
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.