• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • एक लाखाचे तीन कोटी! 'या' बँकेच्या स्टॉकमध्ये 30,472 रुपयांची नव्हे टक्क्यांची वाढ, अजूनही कमाईची संधी

एक लाखाचे तीन कोटी! 'या' बँकेच्या स्टॉकमध्ये 30,472 रुपयांची नव्हे टक्क्यांची वाढ, अजूनही कमाईची संधी

या बँकेच्या शेअरवर नजर टाकली तरी गेल्या एका महिन्यात 8 टक्क्यांहून जास्त रिटर्न्स दिले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 19 ऑक्टोबर : शेअर मार्केटमध्ये (Share Market) योग्य पद्धतीने गुंतवणूक केली तर त्यातून चांगले रिटर्न मिळतात, हे अनेक कंपन्यांनी सिद्ध केलंय. काही कंपन्यांचे शेअर्स तर असे आहेत की त्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. दुप्पट तिप्पट नाही तर गुतंवणूकदारांचे पैसे अनेक पटीने वाढले आहेत. HDFC Bank असाच एक शेअर आहे. HDFC Bank चा शेअर आज 1687 रुपयांच्या पातळीवर आहे. HDFC Bank शेअरने 1650 रुपयांचा ब्रेकआउट ओलांडला आहे आणि आता तो 1800 रुपयांच्या रेंजपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शेअरमध्ये लॉंग टर्म राहिलेल्या गुंतवणूकदारांना प्रचंड फायदा झाला. एचडीएफसी बँकेच्या शेअरवर नजर टाकली तरी गेल्या एका महिन्यात 8 टक्क्यांहून जास्त रिटर्न्स दिले आहेत. गेल्या महिनाभरात एचडीएफसी बँकेचे शेअर 127.75 रुपयांनी वाढले आहेत. गेल्या महिन्यात 20 सप्टेंबर रोजी हा शेअर 1559.95 रुपयांवरून 1687 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्याचबरोबर गेल्या एका वर्षात या शेअर्समध्ये 37.88 टक्क्यांची म्हणजेच 37.88 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. 20 ऑक्टोबर 2020 रोजी या शेअरची किंमत 1223.95 रुपये होती. कागद नाही तर या पदार्थापासून तयार होतात नोटा; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
   पाच वर्षात गुंतवणूकदारांना 165 टक्कांनी रिटर्न्स
  गेल्या 5 वर्षात, एचडीएफसी बँकेचे शेअर्स 635 रुपयांवरून 1687 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या दरम्यान, गुंतवणूकदारांना 165 टक्कांनी रिटर्न्स मिळाले आहेत. जर गेल्या 22 वर्षांचे रिटर्न्सचा विचार केला तर ज्यांनी हा शेअर एवढी वर्ष होल्ड केला असेल त्यांना झालेल्या नफ्याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल. एचडीएफसी बँकेचा शेअर 1 जानेवारी 1999 रोजी 5.52 रुपयांवर बंद झाला आणि आता त्याच्या शेअरची किंमत 1687 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजे या शेअरची किंमत या कालावधील 1682 रुपयांनी वाढली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना 30,472 टक्क्यांनी फायदा झाला आहे. Gold Price Today: सोने-चांदी दरात पुन्हा वाढ, पाहा आजचा लेटेस्ट रेट
   22 वर्षांत एक लाखाचे तीन कोटी
  यानुसार, जर तुम्ही 1 जानेवारी 1999 मध्ये HDFC बँकेच्या शेअर्समध्ये 1 लाख 10 हजार रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत आज 3 कोटी 37 लाख रुपये असते. दुसरीकडे, जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत 2.65 लाख रुपये झाली असती. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक समीत बगाडिया यांनी म्हटलं की, एचडीएफसी बँकेने अलीकडेच 1650 रुपयांचा ब्रेकआउट ओलांडला आहे. आता 1750-1800 रुपयांच्या टार्गेटसह खरेदी करता येऊ शकते. तसेच 1630 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवू शकता.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: