कोरोनामुळे शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 30 हजारपेक्षा कमी, गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले

कोरोनामुळे शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 30 हजारपेक्षा कमी, गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले

कोरोनामुळे शेअर बाजारात हाहाकार सुरूच आहे. दुपारच्या व्यापारी सत्रात सेन्सेक्स (Sensex) 30 हजार अंकापेक्षा खाली गेला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटींपेक्षा जास्त पैसे बुडाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मार्च : देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) चिंतेचे वातावरण आहे. बुधवारी शेअर बाजार उघडल्यानंतर निर्देशांक वधारला होता, मात्र मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे शेअर बाजार कोसळला आहे. दुपारच्या व्यापारी सत्रात सेन्सेक्स (Sensex) 30 हजार अंकापेक्षा खाली गेला आहे. 1,285 अंकांनी घसरून सेन्सेक्स 29,293.88 वर पोहोचला आहे.  निफ्टी50 (Nifty50) 373.20 अंकांनी घसरून 8,593.70 वर पोहोचला आहे.

(हे वाचा-सुप्रीम कोर्टाने टेलिकॉम कंपन्यांना फटकारलं, MDना दिला तुरूंगात पाठवण्याचा इशारा)

सेन्सेक्स 30 चे 28 शेअर रेड मार्कमध्ये व्यापार करत आहेत. तर निफ्टी 50 मधील 7 शेअर ग्रीन मार्कमध्ये व्यापार करत आहेत. Dow Futures ला सुद्धा लोअर सर्किट लागलं आहे. त्यामुळे त्याचा बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. आजच्या कारभारात बँक, अर्थ, वाहनांसह सर्वच विभागातील शेअर्सची विक्री करण्यात येत आहे. बाजारात एवढी मोठी घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

गुंतवणूकदारांना 5 लाख कोटींपेक्षा जास्त रकमेचा फटका

बाजारामध्ये मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा झटका मिळाला आहे. बुधवारी गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

(हे वाचा-कोरोनाला हरवणारा भारत बनला 5वा देश, औषधं तयार करण्यात होणार मदत)

मंगळवारी बीएसई (BSE) मध्ये सूचीबद्ध कंपन्यांची (Listed Companies) एकूण मार्केट कॅप 1,19,52,066.11 कोटी रुपये होती, जी आज 5,13,026.89 कोटी रुपयांनी घसरून 1,14,39,039.22 कोटी रुपयांवर गेली.

जागतिक मंदीचं सावट

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जागतिक मंदीचे सावट आहे. S&P ने भारत, चीन आणि जपानची वाढ घटण्याचा अंदाज (Growth Forecast) व्यक्त केला आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने भारताच्या वाढीचा अंदाज 5.7 टक्क्यांवरून 5.2 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. चीनच्या वाढीचा अंदाज 4.8 टक्क्यांवरून 2.9 % तर जपानच्या वाढीचा अंदाज 0.4 टक्क्यांवरून -1.2 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.

वोडाफोन आयडियाचे शेअर 35 टक्क्यांनी घसरले

एजीआर थकबाकी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने टेलिकॉम कंपन्यांना सुनावलं आहे की, सेल्फ असेसमेंट करणं कोर्टाचा अवमान करण्यासारखं आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली मेट्रोला याचिका परत घेण्यासही सांगितलं आहे. कोर्टाने पुढे म्हटले आहे की या संदर्भातील आमचा आदेश पूर्णपणे स्पष्ट आहे. थकबाकी प्रकरणात कोणताही आक्षेप सहन केला जाणार नाही. कोर्टाच्या आदेशाशिवाय स्वत:चे मूल्यांकन चुकीचे आहे. कोर्टाने असा सवाल केला आहे की, ‘स्वत: च्या मूल्यांकनास कोणी मान्यता दिली. कंपन्यांनी स्वत: ला अधिक सामर्थ्यवान मानू नये.’ या बातमीनंतर व्होडाफोन आयडियाचे शेअर्स 35 टक्क्यांनी घसरले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2020 02:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading