मुंबई, 3 जानेवारी : हॉस्पिटॅलिटी फर्म OYO चे 500 हून अधिक कर्मचारी आणि माजी कर्मचाऱ्यांनी एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्रोग्राम (ESOP) वापरून कंपनीचे 3 कोटींहून अधिक शेअर्स खरेदी केले आहेत. त्याची एकूण किंमत सुमारे 330 कोटी रुपये आहे. कर्मचार्यांनी ही खरेदी अशा वेळी केली आहे जेव्हा OYO इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) आणण्याची तयारी करत आहे. भारतात तसेच परदेशात हॉटेल चेन चालवणाऱ्या OYO ने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत सांगितले की, कंपनीच्या एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्रोग्राम (ESOP) अंतर्गत विद्यमान आणि माजी कर्मचाऱ्यांनी त्यातील तीन कोटींहून अधिक शेअर्स खरेदी केले आहेत. कोरोना महामारीच्या काळात कर्मचार्यांना पगार कपात आणि तात्पुरती रजेवर पाठवलं होते. या कालावधीत OYO ने कर्मचार्यांना कमी किमतीत ESOPs ऑफर केले होते. सध्याच्या काळात इन्शुरन्स का गरजेचा आहे? कोणते इन्शुरन्स घेतलेच पाहिजे? चेक करा डिटेल्स कंपनीने गेल्या वर्षी टेक्नोलॉजी कंपनी मायक्रोसॉफ्टकडून 50 लाख डॉलर जमा केले होते. या कालावधीत, OYO चे मूल्यांकन 9.6 अब्ज डॉलर इतके होते. OYO ची ऑपरेशन्स मॅनेजमेंट कंपनी Oravel Stage Ltd. कंपनीच्या विद्यमान आणि माजी कर्मचाऱ्यांनी सुमारे 330 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. संपर्क साधला असता, OYO च्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. Oyo ने IPO द्वारे 8,430 कोटी रुपये उभारण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी SEBI कडे ड्राफ्ट पेपर सादर केले होते. याला सेबीकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. OYO ने सांगितले की, कंपनी आयपीओमधून मिळालेली रक्कम कर्जाची परतफेड आणि व्यवसाय विस्तारासाठी वापरेल. Business Idea: महिन्याकाठी 1 लाख रुपये कमवायची सुवर्णसंधी, फक्त 50 हजारांमध्ये सुरु करा हा व्यवसाय Oyo चे संस्थापक रितेश अग्रवाल या IPO मधील कोणतेही स्टेक विकणार नाहीत. अग्रवाल यांच्याकडे कंपनीत 34 टक्के हिस्सा आहे. याशिवाय, Lightspeed Venture Partners, Sequoia Capital, Star Virtue Investment, GreenOaks Capital आणि Microsoft सारखे गुंतवणूकदार देखील त्यांचा हिस्सा विकणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.