मराठी बातम्या /बातम्या /मनी /LICची खास पॉलिसी 28 रुपयांत मिळणार 2 लाखांपर्यंत फायदा; जाणून घ्या सविस्तर

LICची खास पॉलिसी 28 रुपयांत मिळणार 2 लाखांपर्यंत फायदा; जाणून घ्या सविस्तर

पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर एकरकमी परतावा मिळणार आहे. जाणून घेऊया याविषयी...

पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर एकरकमी परतावा मिळणार आहे. जाणून घेऊया याविषयी...

पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर एकरकमी परतावा मिळणार आहे. जाणून घेऊया याविषयी...

नवी दिल्ली, 3 जून : एलआयसीची (LIC) सूक्ष्म बचत विमा योजना, (Micro Bachat Insurance Policy) अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींसाठी फायदेशीर आहे. ज्या लोकांचे उत्पन्न अल्प आहे, त्यांच्यासाठी एलआयसीचा मायक्रो इन्श्युरन्स प्लॅन (Micro Insurance Plan) खूपच उपयुक्त आहे. सुरक्षा आणि बचत यांची सांगड या प्लॅनमध्ये घालण्यात आली आहे. आकस्मिक मृत्यू झाल्यास या प्लॅनमुळे संबंधिताच्या वारसांना पूर्ण अर्थिक आधार मिळू शकणार आहे. तसेच पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर एकरकमी परतावा मिळणार आहे. जाणून घेऊया या प्लान विषयी...

कर्ज सुविधा मिळणार - सूक्ष्म बचत असं नामकरण केलेल्या या नियमित प्रिमियमच्या प्लॅनमध्ये अनेक फिचर्सचा समावेश आहे. या इन्श्युरन्स प्लॅनमध्ये 50 हजार ते 2 लाखांपर्यंतचा विमा मिळू शकेल. हा नॉन लिंक्ड इन्श्युरन्स प्लॅन (Non Linked Insurance Plan) आहे. या प्लॅननुसार पॉलिसीत लॉयल्टीचा फायदा मिळणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने 3 वर्षांपर्यंत प्रिमियम भरला तर त्यास मायक्रो बचत प्लॅन नुसार कर्जसुविधा (Loan) देखील मिळू शकेल.

हा प्लॅन कोण घेऊ शकतो – हा विमा केवळ 18 ते 55 या वयोगटातील व्यक्तींसाठीच आहे. यासाठी वैद्यकिय तपासणी करण्याची आवश्यकता नाही. जर एखादी व्यक्ती या प्लाननुसार सलग 3 वर्षे प्रिमियम (Premium) भरत असेल आणि त्यानंतर प्रिमियम भरु शकली नाही तरी 6 महिन्यांपर्यंत विमा सुविधा सुरु राहिल. हा प्रिमियम पॉलिसीधारकाने सलग 5 वर्षांपर्यंत भरला तर त्यास 2 वर्षांसाठी ऑटो कव्हर (Auto Cover) मिळेल. या प्लॅनची संख्या 851 आहे.

केवळ 5 हजार रुपये गुंतवून मिळवा 50000, या व्यवसायासाठी मोदी सरकारही करत आहे मदत

पॉलिसी टर्म किती वर्षांसाठी असेल – मायक्रो बचत इन्श्युरन्स प्लानची पॉलिसी टर्म 10 ते 15 वर्षे असेल. या प्लानमध्ये वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा मासिक पध्दतीने प्रिमियम भरता येईल. यात पॉलिसीधारकाला एलआयसीच्या अॅक्सिडेंटल राईडरला जोडण्याची संधी मिळेल. मात्र त्यासाठी पॉलिसीधारकाला वेगळा प्रिमियम द्यावा लागेल.

दररोज 28 रुपयांत मिळेल 2 लाखांचा विमा- यानुसार 18 वर्षांवरील कोणीही व्यक्ती जर 15 वर्षांसाठी प्लॅन घेत असेल तर त्यास प्रति हजार 51.5 रुपये प्रिमियम भरावा लागेल. 25 वर्षांसाठी 51.60 तर 35 वर्षांसाठीच्या प्लॅन करिता 52.20 रुपये प्रतिहजार प्रिमियम भरावा लागेल. 10 वर्षांसाठीच्या प्लॅनमध्ये प्रिमियम 85.45 ते 91.9 रुपये असेल. प्रिमियममध्ये 2 टक्के सूट देखील मिळेल. खरेदी केल्यानंतर हा विमा तुम्हाला आवडला नाही तर तुम्ही 15 दिवसांच्या आता पॉलिसी सरेंडर करु शकता. जर एखादी 35 वर्षीय व्यक्ती 1 लाखासमान अश्योर्ड असलेली 15 वर्षांची पॉलिसी घेत असेल तर त्यास वर्षिक प्रिमियम 5116 रुपये येईल. चालू पॉलिसी तील 70 टक्के रकमेवर कर्जदेखील मिळेल. त्याचवेळी पेड-अप पॉलिसी मधील 60 टक्के रकमेवर कर्ज मिळू शकेल.

कमाईची सुवर्णसंधी! या सरकारी बँकेत गुंतवा पैसे, पुढील 6 महिन्यात मिळेल 60 टक्क्यांहून अधिक रिटर्न

हे आहे गणित – जर एखादी 35 वर्षीय व्यक्ती पुढील 15 वर्षांसाठी ही पॉलिसी घेत असेल तर त्याला वर्षाला 52.20 रुपये प्रति हजार प्रीमियम जमा करावा लागेल. याप्रमाणे 2 लाख रुपयांची विमा रक्कम घेतल्यास त्या व्यक्तीला वर्षाला 52.20*100*2 म्हणजेच 10,300 रुपये जमा करावे लागतील. याचाच अर्थ रोज 28 रुपये आणि महिन्याला 840 रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल.

प्रिमियम भरल्यावर मिळेल कलम 80 c नुसार सूट – याकालावधीत कर्जावर 10.42 टक्के व्याज द्यावे लागेल. प्रिमियम भरण्यासाठी 1 महिन्याची सूट असेल. पॉलिसी मॅच्युरिटीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष असेल. ही एक जीवन विमा पॉलिसी असल्याने त्यासाठी तुम्हाला सेक्शन 80 C नुसार आयकरात सूट मिळेल.

First published:

Tags: Insurance, Investment, LIC