नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर: मोदी सरकारद्वारे (Modi Government Scheme) नागरिकांसाठी विविध स्कीम्स राबवल्या जातात. यापैकी एक महत्त्वाची स्कीम आहे आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (Atmanirbhar Bharat Rojgar Yojana). या योजनेअंतर्गत तुम्हाला नोंदणी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या योजनेत नोंदणीची तारीख वाढवून 31 मार्च 2022 करण्यात आली आहे. याआधी ही तारीख 30 जून 2021 होती, मात्र आता ही तारीख वाढवून 31 मार्च 2022 करण्यात आली आहे. labour.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करून तुम्ही आत्मनिर्भर भारत योजनेविषयी अधिक माहिती घेऊ शकता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employee Provident Fund Organization) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ABRY अंतर्गत रजिस्ट्रेशन सुविधेची तारीख वाढवण्याबाबत ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ABRY अंतर्गत नोंदणी सुविधेची तारीख 31 मार्च 2022 करण्यात आली आहे.
Registration facility under #ABRY has been extended till 31.03.2022.#ABRY के तहत पंजीकरण सुविधा 31.03.2022 तक बढ़ा दी गई है।#EPFO #Employees pic.twitter.com/aYdiwG7pzc
— EPFO (@socialepfo) November 24, 2021
अशाप्रकारे कराल नोंदणी ईपीएफ आणि एमपी कायदा 1952 अंतर्गत नोंदणीकृत नवीन कर्मचारी आणि नवीन आस्थापना 31 मार्च 2022 पर्यंत नोंदणीसाठी पात्र आहेत. अधिक माहितीसाठी आणि नोंदणी तपशिलासाठी EPFO च्या अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर इच्छुकांना ABRY टॅबवर जावे लागेल. हे वाचा- तुमच्या कामाची बातमी! Car Loan घेत असाल तर काय करावं आणि काय करू नये? जाणून घ्या 10 ऑक्टोबर 2020 पासून आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. रोजगार देण्यासाठी कंपन्यांना प्रोत्साहन देणे आणि देशातील रोजगार रुळावर आणणे हे या योजनेचे ध्येय आहे.