जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Stock Market : शेअर बाजार कोसळला, 'या' सेक्टरला बसला मोठा धक्का, तुमचे शेअर्स तर नाहीत?

Stock Market : शेअर बाजार कोसळला, 'या' सेक्टरला बसला मोठा धक्का, तुमचे शेअर्स तर नाहीत?

Stock Market : शेअर बाजार कोसळला, 'या' सेक्टरला बसला मोठा धक्का, तुमचे शेअर्स तर नाहीत?

शेअर बाजार कोसळला, रुपया पुन्हा घसरला; कोणत्या सेक्टरला सगळ्यात जास्त कोणत्या सेक्टरला बसला धक्का वाचा सविस्तर

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : सोमवारी सकाळी शेअर मार्केट उघडताच स्थिती आशाजनक होती. मात्र पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात निराशाच पदरात पडली आहे. रुपया पुन्हा एकदा घसरला आहे. डॉलर मजबूत झाला असून शेअर मार्केटवर त्याचा दबाव पाहायला मिळत आहे. शेअर मार्केट पुन्हा एकदा कोसळलं. IT, auto आणि बँक सेक्टरमधील गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. डॉलरच्या तुलनेत सकाळच्या व्यवहारात रुपया कमजोर होताना दिसत आहे. डॉलरच्या तुलनेत आज रुपया 28 पैशांनी कमजोर होऊन 81.62 वर उघडला. दुसरीकडे, शुक्रवारी (३० सप्टेंबर) डॉलरच्या तुलनेत रुपया 81.34 वर बंद झाला होता. सध्या रात्री 10.56 च्या सुमारास डॉलरच्या तुलनेत रुपया 81.74 च्या पातळीवर दिसत आहे. गेल्या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाची हालचाल पाहता, या आठवड्यातही भारतीय रुपयाची घसरण सुरूच राहिली कारण तो प्रति डॉलर 81.95 या नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. 30 सप्टेंबर रोजी रुपया 35 पैशांनी घसरून 81.34 प्रति डॉलरवर बंद झाला. 23 सप्टेंबर रोजी रुपया 80.99 वर बंद झाला होता. गेल्या अडीच आठवड्यात रुपया 221 पैशांनी घसरला आहे. पुढे, ते 80-82 च्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात