मराठी बातम्या /बातम्या /मनी /

गेल्या 7 वर्षांत 7 स्टार्टअप; अत्यंत कमी काळात या कंपन्यांनी तयार केला स्वत:चा ब्रँड

गेल्या 7 वर्षांत 7 स्टार्टअप; अत्यंत कमी काळात या कंपन्यांनी तयार केला स्वत:चा ब्रँड

युनिकॉर्न स्टार्टअप म्हणजे नेमकं काय? भारतातील पहिलं युनिकॉर्न स्टार्टअप कोणतं? वाचा डिटेल्स

युनिकॉर्न स्टार्टअप म्हणजे नेमकं काय? भारतातील पहिलं युनिकॉर्न स्टार्टअप कोणतं? वाचा डिटेल्स

काही स्टार्टअप्स तर अल्पावधीत यशस्वी ठरले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा मिळू लागल्या आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 6 डिसेंबर : सुशिक्षित युवकांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता, स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगार उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. यासाठी सरकारदेखील सर्वतोपरी मदत करत आहे. यासाठी पुढे येणाऱ्या तरुण-तरुणींना आर्थिक साह्य, मार्गदर्शन दिलं जात आहे. गेल्या काही वर्षांत देशभरात स्टार्टअपचे वारे वाहू लागले आहेत. काही स्टार्टअप्स तर अल्पावधीत यशस्वी ठरले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा मिळू लागल्या आहेत. या यशस्वी स्टार्टअपच्या यादीत ओला, उबर, ओयो, झोमॅटो आणि स्विगी यांसारख्या कंपन्यांची नावं प्राधान्यक्रमाने येतात. या यादीतल्या अनेक कंपन्यांची अ‍ॅप्स तर प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये आवर्जून असतात; मात्र एखादा उद्योग-व्यवसाय सुरू करून त्यात मोठं यश मिळवणं नक्कीच सोपं नाही. गेल्या सात वर्षांत व्यवसायात उत्तम प्रगती करून प्रसिद्ध ब्रॅंड झालेल्या काही स्टार्टअप कंपन्यांविषयी जाणून घेऊ या. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.

गेल्या काही वर्षांत देशातल्या युवकांनी नवा विचार आणि ऊर्जा या दोन्ही गोष्टींच्या मदतीनं नव्या व्यवसायाचा पाया रचून नागरिकांना सुविधा देण्यास सुरुवात केली. या स्टार्टअप्प्सपैकी ओला, उबर, ओयो, झोमॅटो आणि स्विगी यांसारखे ब्रॅंड आज यशाच्या शिखरावर आहेत. खरं तर कोणत्याही देशात व्यवसाय करणं सोपं की अवघड हे तिथली व्यवस्था, नियम आणि कायद्यावर अवलंबून असतं. भारतात आता नवीन कंपनी सुरू करणं, व्यापार करणं किंवा नवा स्टार्टअप सुरू करणं हे पूर्वीपेक्षा खूप सोपं झालं आहे. ईझ ऑफ डुइंग बिझनेस म्हणजे व्यापार सुलभतेच्या बाबतीत देशाची क्रमवारी बरीच सुधारली आहे. त्यामुळे आज अनेक स्टार्टअप्स यशस्वी होत आहेत. 2014नंतर असे अनेक स्टार्टअप्स जे बाजारात आले, त्यांनी बाजारात स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि आज ते ब्रॅंड बनले आहेत.

'ग्लोबल बीज'ने मार्केटमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. मे 2021 मध्ये नितीन अग्रवाल यांनी व्यवसायाच्या अनेक श्रेणी सुरू केल्या. यात गृहोपयोगी वस्तूंपासून ते ब्यूटी अँड पर्सनल केअर आणि न्यूट्रिशन्स अँड वेलनेसपर्यंत विविध गोष्टींचा समावेश होता. त्यासोबत यात फॅशन ज्वेलरी आणि आयवेअरचाही समावेश होता. या कंपनीने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत आपलं स्थान निर्माण केलं आणि युनिकॉर्नचा दर्जा मिळवला. एका अहवालानुसार, या कंपनीचं मूल्यांकन अंदाजे 8200 कोटी रुपये आहे.

केवळ 1 रुपयांत फ्लाइट तिकीट देतंय 'हे' अ‍ॅप! काय आहे प्रोसेस? वाचा सविस्तर

2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार सत्तेत आलं, तेव्हापासून ईझ ऑफ डुइंग बिझनेसमध्ये सुधारणा होत असल्याचं दिसून आलं. 2014मध्ये फूड डिलिव्हरी सेगमेंटमध्ये स्विगीची एंट्री झाली. श्रीहर्ष मजेठी आणि नंदन रेड्डी हे दोन युवक कुरिअर सर्व्हिस सेक्टरमध्ये कार्यरत होते. या दोघांना सर्वांत प्रथम फूड डिलिव्हरीची कल्पना सुचली आणि जुलै 2014 मध्ये Myntra चे सर्वोसर्वा राहुल जेमिनी यांच्यासोबत त्यांनी स्विगी सुरू केलं. आज स्विगी हा एक ब्रँड म्हणून ओळखला जातो.

ममाअर्थविषयी तुम्ही ऐकलं असेल. या कंपनीची संस्थापिका गझल अलग हिला तुम्ही शार्क टॅंक इंडिया या लोकप्रिय टीव्ही शोत पाहिलं असेल. सौंदर्य प्रसाधनं अर्थात कॉस्मेटिक उद्योगातल्या या नव्या स्टार्टअपचा पाया 2016 मध्ये घातला गेला. गझल अलग आणि वरुण अलग या दोघांनी मिळून ही कंपनी सुरू केली. आपली प्रॉडक्ट्स विषमुक्त आणि रसायनमुक्त असल्याचा दावा या जोडप्यानं केला आहे. प्रॉडक्ट्स पूर्णतः नैसर्गिक आहेत, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. अलग जोडप्यानं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज देशातल्या निवडक युनिकॉर्न कंपन्यांमध्ये या कंपनीचं नाव समाविष्ट झाले आहे. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातले सदस्य या कंपनीचं कोणतं तरी उत्पादन नक्कीच वापरत असाल.

आताचा जमाना हा केवळ शिक्षणाचा राहिलेला नाही. नोकरी हवी असेल किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर कौशल्याला खूप महत्त्व आहे; पण नोकरी-व्यवसाय सोडून कुशल होण्यासाठी नेमकं जायचं कुठं हा प्रश्न युवकांना पडतो. ऑनलाइन क्लासेसची सुविधा ही प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. या पार्श्वभूमीवर 2015 मध्ये रॉनी स्क्रूवाला यांच्यासोबत मयंक कुमार, फाल्गुन कोमपल्ली आणि रविजोत चुग यांनी upGrad ला सुरुवात केली. ही कंपनी आता युनिकॉर्न बनली आहे. या प्लॅटफॉर्मवर युवकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाइन सर्टिफिकेशन, डिप्लोम, डिग्री प्रोग्राम उपलब्ध आहेत. युवकांना कौशल्य विकासासाठी ही एक उत्तम सेवा आहे. आज ही कंपनी ब्रँड म्हणून ओळखली जात आहे.

विमा ही अत्यावश्यक गुंतवणूक मानली जाते. खासकरून कोरोना काळात लोकांना विम्याचं महत्त्व पटलेलं आहे. देशात अनेक विमा कंपन्या आहेत. एको इन्शुरन्स ही त्यापैकीच एक होय. ही देशातली पहिली डिजिटल विमा कंपनी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. वरुण दुआ यांनी 2016मध्ये ही कंपनी सुरू केली. विमा नियामक आयआरडीएआयकडून कंपनीला जनरल इन्शुरन्सचा परवाना मिळालेला आहे. एको हीसुद्धा एक युनिकॉर्न कंपनी आहे. या कंपनीचं मूल्यांकन सुमारे 110 अब्ज डॉलर्स आहे.

तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल. तसंच योग्य वेळी बिलंदेखील भरत असाल. काही जण बिलं वेळेत भरायला विसरतात. एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांकडून असं होण्याची शक्यता असते. ग्राहकांचं हे टेन्शन Cred ही कंपनी घेते. ही एक अनोखी फिनटेक कंपनी असून 2018 मध्ये कुणाल साह यांनी तिची स्थापना केली. क्रेड कंपनी दोन कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. एक तर या कंपनीच्या जाहिरातींमुळे. कारण अनेक बडे स्टार या कंपनीची जाहिरात करतात. दुसरं कारण म्हणजे कंपनीची फीचर्स. क्रेड आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांना सर्व प्रकारची क्रेडिट कार्ड बिल्स सुलभतेनं भरण्याची सुविधा देते. अवघ्या काही वर्षांत ही कंपनी एक ब्रँड म्हणून प्रस्थापित झाली आहे.

Myntra या ऑनलाइन शॉपिंग कंपनीचे सहसंस्थापक मुकेश बन्सल यांनी 2016 मध्ये अंकित नागोरी यांच्या सोबत एका नव्या स्टार्टअपला सुरुवात केली. त्यांनी त्याचं नाव Cure.fit असं ठेवलं. नागरिकांचं आरोग्य उत्तम राहावं, असा या स्टार्टअपचा उद्देश आहे. ही एक फिटनेस स्टार्टअप कंपनी आहे. ही कंपनी ऑनलाइन, तसंच ऑफलाइनदेखील कार्यरत आहे. ही कंपनी न्यूट्रिशन्स, क्लाउड किचन श्रेणीतही काम करते. स्थापनेपासून अवघ्या काही वर्षांत या कंपनीने आपलं स्थान निर्माण केलं असून, आज ती बाजारपेठेत एक मोठा ब्रँड म्हणून ओळखली जाते.

First published:

Tags: Brand, Startup