मराठी बातम्या /बातम्या /मनी /

केवळ 1 रुपयांत फ्लाइट तिकीट देतंय 'हे' अ‍ॅप! काय आहे प्रोसेस? वाचा सविस्तर

केवळ 1 रुपयांत फ्लाइट तिकीट देतंय 'हे' अ‍ॅप! काय आहे प्रोसेस? वाचा सविस्तर

केवळ 1 रुपयांत फ्लाइट तिकीट देतंय 'हे' अ‍ॅप! काय आहे प्रोसेस? वाचा सविस्तर

केवळ 1 रुपयांत फ्लाइट तिकीट देतंय 'हे' अ‍ॅप! काय आहे प्रोसेस? वाचा सविस्तर

तिकीट बुकिंग अ‍ॅप ट्रेनमॅनने एक नवीन फीचर आणलं आहे. यामध्ये प्रवाशांना कन्फर्म ट्रेन तिकिटाची हमी दिली जाईल आणि सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की जर तुमचं ट्रेनचं तिकीट कन्फर्म झालं नाही तर कंपनी तुम्हाला प्रवास करण्यासाठी एअर तिकीट देईल.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 26 नोव्हेंबर: भारतात रेल्वे तिकीट बुक करण तसं अवघड काम आहे. रेल्वे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना वारंवार प्रयत्न करावं लागतात. अनेक प्रकरणांमध्ये प्रवाशांचे तिकीट कन्फर्म होते. मात्र अनेक वेळा प्रवाशांना जागा मिळत नसल्यानं शेवटच्या क्षणी त्रासाला सामोरं जावं लागतं. हे पाहता तिकीट बुकिंग अ‍ॅप ट्रेनमॅनने एक नवीन फीचर आणलं आहे. यामध्ये प्रवाशांना कन्फर्म ट्रेन तिकिटाची हमी दिली जाईल आणि सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की जर तुमचं ट्रेनचं तिकीट कन्फर्म झालं नाही तर कंपनी तुम्हाला प्रवास करण्यासाठी एअर तिकीट देईल.

फीचर कसं कार्य करते?

वास्तविक ट्रेनमॅन अ‍ॅपनं ट्रिप अ‍ॅश्युरन्स नावाचं नवीन फीचर लाँच केलं आहे. या नवीन फीचरच्या मदतीनं वेटिंग लिस्टमध्ये असलेले रेल्वे प्रवासी आपला प्रवास पूर्ण करू शकतील. या अ‍ॅपद्वारे कोणीही रेल्वे तिकीट बुक करतो. तो अ‍ॅपमध्येच त्याच्या तिकिटाचं स्टेटस पाहू शकतो. प्रवाशाला कन्फर्म तिकीट न मिळाल्यास अ‍ॅप तिकीट कन्फर्म मिळण्याची शक्यता किती आहे हे दर्शवेल. चार्ट तयार करण्यापूर्वी तुमचं तिकीट कन्फर्म न झाल्यास ट्रिप अ‍ॅश्युरन्स फीचरच्या मदतीनं प्रवासी शेवटच्या क्षणी हवाई तिकीट बुक करू शकतात.

हेही वाचा- ‘नो कॉस्ट EMI’ म्हणजे ग्राहकांची दिशाभूल? वाचा काय म्हणते RBI

अ‍ॅपमध्ये प्रवाशाचं तिकीट बुक करण्याची शक्यता 90 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास अ‍ॅप 1 रुपये ट्रॅप अ‍ॅश्युरन्स फी आकारेल. जर ही शक्यता 90 टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर कंपनी तिकीटाच्या क्लासनुसार नाममात्र शुल्क आकारेल. यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे चार्ट तयार होत असताना ट्रेनचे तिकीट कन्फर्म झाल्यास ट्रिप अ‍ॅश्युरन्स फी परत केली जाईल. मात्र तिकीट कन्फर्म न झाल्यास ट्रेनमॅन प्रवाशाला प्रवास पूर्ण करण्यासाठी मोफत विमान तिकीट देईल.

या ट्रेनसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे-

हे देखील लक्षात घेण्यासारखं आहे की ट्रिप अ‍ॅश्युरन्सचे हे वैशिष्ट्य सध्या सर्व IRCTC राजधानी ट्रेन आणि सुमारे 130 इतर ट्रेनसाठी उपलब्ध आहे. कंपनीच्या मते, ट्रेनमॅन अ‍ॅप मशीन लर्निंग सारख्या नवीन युगातील तंत्रज्ञानाचा वापर करते आणि ते IRCTC चे अधिकृत भागीदार आहे. प्रवाशांना त्रासमुक्त प्रवासाचा अनुभव देण्यासाठी ट्रिप अ‍ॅश्युरन्सचे वैशिष्ट्य सुरू करण्यात आलं आहे.

रिपोर्ट्सनुसार, कंपनीचा दावा आहे की वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता वर्तवण्यात 90 टक्के अचूक आहे. पण तिकीट कन्फर्म न झाल्यास कंपनी त्या व्यक्तीला मोफत विमान तिकीट देईल. तथापि ट्रिप अ‍ॅश्युरन्सची ही सुविधा ज्या शहरांमध्ये विमानतळ आहेत त्यांनाच लागू असेल.

First published:

Tags: Train, Travel by flight