Home /News /money /

ICICI बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका; 'या' सेवेसाठी द्यावा लागणार सर्विस चार्ज, किती खर्च वाढणार?

ICICI बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका; 'या' सेवेसाठी द्यावा लागणार सर्विस चार्ज, किती खर्च वाढणार?

ICICI Pay Later Account हे एक प्रकारचे डिजिटल क्रेडिट आहे. या सेवेअंतर्गत तुम्ही आधी खर्च करू शकता आणि नंतर पैसे देऊ शकता. या अंतर्गत, बँक आपल्या ग्राहकांना 30-45 दिवसांच्या कालावधीसाठी व्याजमुक्त क्रेडिट सेवा देत आहे.

    मुंबई, 11 एप्रिल : ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी एक झटका देणारी बातमी आहे. ICICI PayLater वापरणाऱ्या ग्राहकांना आता सेवा शुल्क (Service Charge) भरावा लागेल. सेवा शुल्क एप्रिल 2022 च्या स्टेटमेंटपासून लागू होईल. आतापर्यंत ही सेवा वापरण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नव्हते. तुमचे आयसीआयसीआय पे लेटरमध्ये खाते असल्यास, एप्रिल महिन्यापासून आकारल्या जाणार्‍या सेवा शुल्काबद्दल जाणून घ्या. 1000 रुपयांपेक्षा जास्त मासिक खर्चावर सेवा शुल्क आकारले जाईल ICICI बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ICICI PayLater वापरणाऱ्या ग्राहकांना 1000 रुपयांपेक्षा जास्त मासिक खर्चावर सेवा शुल्क भरावे लागेल. 1001 ते 3000 रुपयांपर्यंत खर्च करण्यासाठी 100 रुपये सेवा शुल्क कराव्यतिरिक्त भरावे लागेल. 3001 ते 6000 रुपयांपर्यंतच्या खर्चासाठी कराव्यतिरिक्त 200 रुपये सेवा शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे 6001 रुपये ते 9000 रुपये खर्च केल्यास 300 रुपये सेवा शुल्क कराव्यतिरिक्त भरावे लागेल. अशाप्रकारे, खर्च केलेल्या प्रत्येक 3000 रुपयांसाठी, 100 रुपये सेवा शुल्क जोडले जाईल. 1000 रुपयांपर्यंत खर्च करण्यासाठी कोणतेही सेवा शुल्क द्यावे लागणार नाही ही दिलासादायक बाब आहे. Gold Price Today : सोन्याच्या किमतीत वाढ, चांदीही महागली; चेक करा एक तोळे सोन्याचे नवे दर 14 फेब्रुवारीनंतर अॅक्टिवेशन चार्जही लागणार 14 फेब्रुवारी 2022 पासून ICICI पे लेटर सेवा अॅक्टिव्ह करण्यासाठी 500 रुपये कराव्यतिरिक्त एक वेळचे अॅक्टिवेशन चार्ज आकारले जाईल. संपत्ती आणि GPC उत्पन्न विभागांसाठी हे शुल्क माफ करण्यात आले आहे. ICICI Pay Later Account म्हणजे काय? ICICI Pay Later Account हे एक प्रकारचे डिजिटल क्रेडिट आहे. या सेवेअंतर्गत तुम्ही आधी खर्च करू शकता आणि नंतर पैसे देऊ शकता. या अंतर्गत, बँक आपल्या ग्राहकांना 30-45 दिवसांच्या कालावधीसाठी व्याजमुक्त क्रेडिट सेवा देत आहे. ICICI PayLater ची सुविधा ही सेवा ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही ही सेवा ICICI च्या iMobile अॅप, पॉकेट्स अॅप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे अॅक्टिव्ह करू शकता. एकदा हे खाते अॅक्टिव्ह झाल्यानंतर, तुम्हाला pl.mobilenumber@icici वर UPI आयडी आणि पे लेटर खाते क्रमांक मिळेल. UPI व्यतिरिक्त ही क्रेडिट सेवा नेटबँकिंगद्वारे देखील वापरली जाऊ शकते. Multibagger Stock: 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल, दोन वर्षात एक लाख बनले 18.25 लाख ICICI PayLater यूजर्स जवळपासच्या दुकानदारांना पेमेंट करू शकतात आयसीआयसीआय पेलेटरचे यूजर्स त्यांच्या आजूबाजूच्या किराणा दुकानातून देखील याद्वारे खरेदी करू शकतात. याद्वारे तुम्ही व्यापारी UPI QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. UPI किंवा ICICI इंटरनेट बँकिंगद्वारे पेमेंट स्वीकारणाऱ्या सर्व ऑनलाइन व्यापाऱ्यांना पे लेटर खात्याद्वारे पेमेंट केले जाऊ शकते. मात्र तुम्ही पे लेटर खात्याद्वारे क्रेडिट कार्ड बिल पेमेंट किंवा पर्सन-टू-पर्सन (P2P) फंड ट्रान्सफर करू शकत नाही.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Icici bank, Money, Payment

    पुढील बातम्या