Home /News /money /

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत वाढ, चांदीही महागली; चेक करा एक तोळे सोन्याचे नवे दर

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत वाढ, चांदीही महागली; चेक करा एक तोळे सोन्याचे नवे दर

Gold-Silver Price Today: सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 48941 रुपयांवर उसळी घेत होता. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 53390 रुपयांवर उघडला. याशिवाय 20 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 44,492 रुपये होती.

    मुंबई, 11 एप्रिल : सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) सोमवारी वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 91 रुपयांनी महागले आहे. या तेजीमुळे आज सकाळी सोने 52162.00 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव (Silver Price Today) 158.00 रुपयांनी वाढला आहे. चांदी 67150.00 वर व्यवहार करत आहे. सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price Today) 48941 रुपयांवर उसळी घेत होता. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 53390 रुपयांवर उघडला. याशिवाय 20 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 44,492 रुपये होती. त्याच वेळी, 18 कॅरेटचा भाव 40443 रुपये आणि 16 कॅरेट सोन्याचा दर 35593 रुपये झाला. सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 68690 रुपये होता. Share Market: शेअर बाजार आज घसरणार की वधारणार? कोणते घटक ठरतील महत्त्वाचे गुंतवणुकीआधी वाचा कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर  सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. Multibagger Stock: 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल, दोन वर्षात एक लाख बनले 18.25 लाख 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यात काय आहे फरक? 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत फरक असतो. प्रमुख फरक सोन्याच्या शुद्धतेचा असतो. 24 कॅरेट सोनं 99.9 टक्के शुद्ध असतं. तर 22 कॅरेट सोनं 91 टक्के शुद्ध असतं. यात 9 टक्के इतर धातू मिक्स असतात. तर 24 कॅरेट सोन्यात कोणतीही भेसळ नसते. परंतु 99.9 टक्के इतक्या शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्यापासून कोणतेही दागिने बनवता येत नाहीत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold and silver prices today, Gold prices today, Investment, Money, Silver prices today

    पुढील बातम्या