मुंबई, 7 ऑगस्ट : भारतातील लोकांना अनेकदा सरकारचे नियम आणि सुविधांची माहिती नसते. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांची योग्य माहिती असेल अनेकांच जगणं सोपं होतं. जनतेला त्यांच्या फायद्याच्या काही योजनांची माहिती व्हावी. तसेच सरकार ज्येष्ठ नागरिकांना अनेक सवलती देते. यामध्ये अशा काही सेवा आहेत ज्यामुळे वृद्धांचे जीवन सुसह्य होऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी सुविधांबद्दल माहिती घेऊयात. भारतातील ज्येष्ठ नागरिक दोन प्रकारात विभागले गेले आहेत. 60 ते 79 वयोगटातील व्यक्तींना ‘ज्येष्ठ नागरिक’ म्हणतात. ज्यांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना सुपर ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. बसचे भाडे कपात बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित जागा पाहिली असेल. बस प्रवासात राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांना बसेसमध्ये सवलतही देते. त्यामुळे त्यांच्यासाठी बसमधील जागा आधीच आरक्षित आहेत. त्यांच्यासाठी मेट्रोमध्येही जागा राखीव असतात. तुमचं व्यावसायिक होण्याचं स्वप्न पूर्ण करा; सरकारच्या ‘या’ योजनेचा घ्या फायदा, 10 लाखांपर्यंत कर्ज मिळेल ज्येष्ठ नागरिकांना बचत योजनेवर जास्त व्याज भारतातील ज्येष्ठ नागरिकांना बँकांमध्ये ठेवलेल्या पैशांवर अधिक व्याज मिळते. कर्ज स्वस्त दरात उपलब्ध आहे, याशिवाय, सरकारकडून अशा विविध योजनांच्या परताव्यावर कर देखील आकारला जात नाही. शासकीय रुग्णालयात सुविधा उपलब्ध ज्येष्ठ नागरिकांना बँका आणि रुग्णालयांमध्येही विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांसाठी हॉस्पिटलमध्ये नोंदणी करण्यासाठी आणि विविध टेस्ट्ससाठी स्वतंत्र रांग असते. पेन्शन योजना देशातील आणि राज्यातील सरकार वृद्धांना निवृत्ती वेतन देते. सध्या दिल्लीचे केजरीवाल सरकार 60 ते 69 वर्षे वयोगटातील वृद्धांना दरमहा 2000 रुपये आणि 70 वर्षांवरील वृद्धांना 2500 रुपये दरमहा देते. तर उत्तर प्रदेश सरकार 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना दरमहा 800 रुपये देते. Online Shoppingवर होईल मोठी बचत, ‘या’ खास क्रेडिट कार्ड्सवर उपलब्ध आहेत विविध ऑफर्स वैद्यकीय बिलात सवलत सरकारने सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅन्सर, मोटर न्यूरॉन डिसीज, एड्स इत्यादी गंभीर आजारांवरील उपचारांवर होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची सवलत मर्यादा वाढवली आहे. आता 60 वर्षांवरील सर्व वृद्ध लोक आयकर कायद्याच्या कलम 80 DDB अंतर्गत वरील नमूद केलेल्या आजारांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांवर प्राप्तिकरात सूट घेऊ शकतात. या लोकांना त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी एक लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.