मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Online Shoppingवर होईल मोठी बचत, 'या' खास क्रेडिट कार्ड्सवर उपलब्ध आहेत विविध ऑफर्स

Online Shoppingवर होईल मोठी बचत, 'या' खास क्रेडिट कार्ड्सवर उपलब्ध आहेत विविध ऑफर्स

Credit Cards: अशी काही क्रेडिट कार्डे आहेत जी ऑनलाइन खरेदी अधिक फायदेशीर करण्यासाठी खास तयार केली गेली आहेत. आम्ही बाजारात सध्या अशा 5 क्रेडिट कार्डांबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये ऑनलाइन शॉपिंगचे चांगले फायदे मिळतात.

    मुंबई, 7 ऑगस्ट : अनेक ई-कॉमर्स कंपन्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खास सेलचे आयोजन करत आहेत. Amazon चा ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल आणि Flipkart चे बिग सेव्हिंग डेज 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान सुरू होतील. या सणासुदीच्या काळात रिलायन्स डिजिटलने 6 ऑगस्टपासून डिजिटल इंडिया सेलची घोषणा केली आहे. बर्‍याच ऑफर ICICI बँक, अॅक्सिस बँक, HDFC बँक, सिटी बँक, एसबीआय कार्ड आणि इतर बँकांसारख्या विशिष्ट क्रेडिट कार्डांसाठी आहेत. मात्र बाजारात अशी काही क्रेडिट कार्डे आहेत जी ऑनलाइन खरेदी अधिक फायदेशीर करण्यासाठी खास तयार केली गेली आहेत. आम्ही बाजारात सध्या अशा 5 क्रेडिट कार्डांबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये ऑनलाइन शॉपिंगचे चांगले फायदे मिळतात. Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरून Amazon अॅप किंवा वेबसाइटवर केलेल्या खरेदीसाठी प्राइम सदस्यांसाठी 5 टक्के आणि नॉन-प्राइम सदस्यांसाठी 3 टक्के अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. या कार्डद्वारे रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी 2 टक्के अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध आहेत. Amazon व्यतिरिक्त कोठेही पेमेंट केल्यावर 1% अनलिमिटेड रिवॉर्ड पॉइंट्स दिले जातात. हे कार्ड आजीवन मोफत आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून Flipkart आणि Myntra वर केलेल्या खरेदीसाठी 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. या कार्डसह, Cleartrip, PVR, Uber, Swiggy, Cure.Fit, Tata 1MG आणि Tata Sky वर खर्च करण्यासाठी 4 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे तर इतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंटवर 1.5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक उपलब्ध आहे. या कार्डची वार्षिक फी 500 रुपये आहे. HDFC बँक मिलेनिया क्रेडिट कार्ड HDFC बँक मिलेनिया क्रेडिट कार्ड वापरून Amazon, Flipkart, Bookmyshow, Myntra, Sony LIV, Swiggy, Tata CLiQ, Uber आणि Zomato वर खर्च केल्यास 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. याशिवाय, इंधन वगळता सर्व व्यवहारांवर 1 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. SBI सिम्पलीक्लिक क्रेडिट कार्ड SBI SimplyClick क्रेडिट कार्ड वापरून खर्च करणाऱ्यासाठी 10X रिवॉर्ड पॉइंट्स Amazon, Apollo24X7, BookMyShow, Cleartrip, Eazydiner, Lenskart आणि Netmeds वर उपलब्ध आहेत. या कार्डद्वारे इतर ऑनलाइन खर्च करण्यासाठी 5X रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध आहेत. या कार्डची वार्षिक फी 499 रुपये आहे. HSBC कॅशबॅक क्रेडिट कार्ड HSBC कॅशबॅक क्रेडिट कार्डद्वारे सर्व ऑनलाइन खर्चांवर (वॉलेट रीलोड्स वगळता) 1.5 टक्के कॅशबॅक आणि इतर प्रकारच्या खर्चांवर 1% कॅशबॅक उपलब्ध आहे. या कार्डची वार्षिक फी 750 रुपये आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Credit card, Online shopping

    पुढील बातम्या