मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुमचं व्यावसायिक होण्याचं स्वप्न पूर्ण करा; सरकारच्या 'या' योजनेचा घ्या फायदा, 10 लाखांपर्यंत कर्ज मिळेल

तुमचं व्यावसायिक होण्याचं स्वप्न पूर्ण करा; सरकारच्या 'या' योजनेचा घ्या फायदा, 10 लाखांपर्यंत कर्ज मिळेल

मुद्रा लोन ही योजना खास लहान उद्योजकांसाठी सुरू करण्यात आली होती. दुकान मालक, फळ/भाजी विक्रेते, लघुउद्योग, अन्न सेवा युनिट, कार्यशाळा, मशीन ऑपरेशन्स, अन्न प्रक्रिया युनिट या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

    मुंबई, 7 ऑगस्ट: अनेकांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते. मात्र पैसा त्या आड येतो. कारण व्यवसाय करायचा म्हणजे मोठी गुंतवणूक करावी लागते. तुम्हीही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक मदत करत आहे. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या या खास योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेअंतर्गत तुम्ही 50 हजार ते 10 लाखांपर्यंत आर्थिक मदत घेऊन तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. ई मुद्रा कर्ज योजना मुद्रा कर्ज योजना ही सरकारद्वारे चालवली जाणारी एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला कर्जाची सुविधा दिली जाते. या प्रकरणात तुम्हाला कर्ज सहज मिळू शकते. विशेष म्हणजे तुम्हाला सिक्युरिटीशिवाय कर्ज मिळेल आणि तुम्हाला कोणतीही प्रक्रिया शुल्क भरण्याची गरज नाही. Online Shoppingवर होईल मोठी बचत, 'या' खास क्रेडिट कार्ड्सवर उपलब्ध आहेत विविध ऑफर्स मुद्रा लोनचा व्याजदर किती? मुद्रा कर्जासाठी बँका वेगवेगळे व्याजदर आकारू शकतात. साधारणपणे किमान व्याज दर 12 टक्के असतो. 3 प्रकारची कर्जे उपलब्ध आहेत. तुम्‍हाला पीएम मुद्रा कर्जाचे फायदे 3 स्‍टेप्‍प्‍समध्‍ये मिळू शकतात. तीन टप्प्यात लोन उपलब्ध शिशू कर्ज योजना- या योजनेअंतर्गत तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. किशोर कर्ज योजना- या योजनेअंतर्गत तुम्हाला 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्जांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. तरुण कर्ज योजना- यात 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येते. ही योजना खास लहान उद्योजकांसाठी सुरू करण्यात आली होती. दुकान मालक, फळ/भाजी विक्रेते, लघुउद्योग, अन्न सेवा युनिट, कार्यशाळा, मशीन ऑपरेशन्स, अन्न प्रक्रिया युनिट या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कॅनरा बँकेच्या ग्राहकांना झटका; कर्जाचे व्याजदर महागल्याने EMI वाढणार कर्ज कसे मिळवायचे? तुम्ही हे कर्ज सरकारी बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका आणि सहकारी बँका कुठूनही घेऊ शकता. RBI ने 27 सार्वजनिक क्षेत्रातील बँका, 17 खाजगी बँका, 31 ग्रामीण बँका, 4 सहकारी बँका, 36 सूक्ष्म वित्तीय संस्था आणि 25 NBFC यांना मुद्रा कर्ज वाटप करण्यासाठी अधिकृत केले आहे. कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट http://www.mudra.org.in/ ला भेट देऊ शकता. येथून फॉर्म डाउनलोड करून, तुम्हाला सर्व तपशील भरणे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. बँक शाखा व्यवस्थापक तुमच्या कामाची माहिती घेतात. त्या आधारावर PMMY तुमचे कर्ज जारी करतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Business, Money

    पुढील बातम्या