मुंबई, 3 ऑगस्ट: मोदी सरकारनं अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा गरिबांना थेट लाभ मिळतो. परंतु आजही 70 टक्के पात्र लोक जागरूकतेअभावी या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेचं नाव आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana). ही योजना लोकांसाठी, विशेषतः गरीब लोकांसाठी महत्त्वाची ठरू शकते. कारण या योजनेत सामील होण्यासाठी तुम्हाला वार्षिक फक्त 12 रुपये गुंतवावे लागतील. त्यानंतर तुम्ही 2 लाखांच्या विमा संरक्षणासाठी पात्र व्हाल. इतकंच नाही तर या योजनेत सहभागी झाल्यानंतर इतर अनेक फायदेही अर्जदाराला मिळतात. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत (PMSBY) सामील झाल्यानंतर, तुमचा गंभीर अपघात किंवा अपघातात मृत्यू झाल्यास, तुम्हाला सरकारी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सामील झाल्यानंतर, तुम्हाला वार्षिक फक्त 12 रुपये जमा करावे लागतील, योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचं वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असणं अनिवार्य आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू किंवा संपूर्ण अपंगत्व आल्यास विमाधारकाला 2 लाख रुपये देण्याची तरतूद आहे. तर अंशतः अपंग असल्यास 1 लाख रुपयांची रक्कम उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बचत खात्याचा तपशील द्यावा लागेल, त्यानंतर दरमहा तुमच्या खात्यातून 1 रुपये प्रीमियम कापला जाईल. हेही वाचा: Voter ID: मतदार ओळखपत्र बनवणं झालं खूपच सोपं, फक्त ‘या’ लिंकवर जा अन् अर्ज करा इतर आवश्यक गोष्टी- अर्जदाराला त्याचं आधार कार्ड बँकेशी लिंक करावं लागेल, त्यानंतर दरवर्षी 1 जूनपूर्वी एक फॉर्म भरून बँकेला द्यावा लागेल. या योजनेत 1 जून ते 31 मे पर्यंत एक वर्षाचे कव्हर आहे, ज्याचे दरवर्षी बँकेमार्फत नूतनीकरण करावं लागतं. जर एखाद्याचं संयुक्त खातं असेल तर अशा परिस्थितीत सर्व खातेदार या योजनेत सामील होऊ शकतात. या योजनेत फक्त एक बँक खातं समाविष्ट केलं जाऊ शकतं. योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी, खातेदाराला ज्या बँकेत त्यांचं खातं आहे, त्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेवर लॉग इन करावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.