नवी दिल्ली, 23 डिसेंबर : करोडपती बनण्याचं स्वप्न बघताय का? तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज आहे का? आता घरबसल्या करोडपती बनण्याची संधी आहे. यासाठी केवळ एक रुपयाचं नाणं असणं आवश्यक आहे आणि 9 कोटी 99 लाख रुपये तुमचे होऊ शकतात. एक रुपयांचं नाणं करोडपती बनवू शकतं. पण हे एखादं सर्वसाधारण नाणं नाही.
कशी होईल कमाई -
करोडपती बनण्यासाठी 1885 या वर्षातील एक रुपयाचं नाणं असणं आवशयक आहे. हे एक रुपयाचं नाणं ऑनलाईन सेल करून 9 कोटी 99 लाख रुपये जिंकण्याची संधी आहे. जगभरात असे अनेक लोक असतात ज्यांना जुन्या अॅन्टिक वस्तू जमा करण्याची, त्या सांभाळून ठेवण्याची आवड असते. अशा या जुन्या, अॅन्टिक वस्तूंचा लिलाव होतो आणि लिलावात अनेक लोक अॅन्टिक वस्तू चांगल्या दरात विकत घेतात.
असे मिळतील 9 कोटी 99 लाख रुपये -
1885 सालातील एक रुपयाचं नाणं विकण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्या याची विक्री करता येणार आहे. त्यासाठी ओएलएक्सच्या (OLX) वेबसाईटवर जाऊन स्वत:चं अकाउंट बनवावं लागेल.
नाण्याचा फोटो अपलोड -
- OLX वर या नाण्याचा लिलाव करता येणार आहे.
- OLX वर अकाउंट बनल्यानंतर विक्रेता म्हणून रजिस्ट्रेशन करावं लागेल.
- रजिस्ट्रेशननंतर तुमच्याकडे असलेल्या 1885 सालातील 1 रुपयाच्या नाण्याचा फोटो साईटवर अपलोड करावा लागेल.
- फोटो अपलोडसह नाणं सेलसाठी टाकता येणार आहे.
देशात नेहमीच जुन्या अॅन्टिक वस्तूंची क्रेझ असते. लोक अनेकदा जुन्या नाण्यांच्या शोधात असतात. अॅन्टिक वस्तूंच्या विक्रीवर चांगली कमाई केली जाते. अशाप्रकारच्या अॅन्टिक वस्तूंची, जुन्या नाण्यांची कमतरता असल्याने, अनेक हौशी लोक याची चांगल्या किंमतीत खरेदी करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.