जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Multibagger Stock: गुंतवणूकदार 6 महिन्यात करोडपती! 2,46,257 टक्क्यांहून अधिक परतावा देणारा 'हा' शेअर कोणता?

Multibagger Stock: गुंतवणूकदार 6 महिन्यात करोडपती! 2,46,257 टक्क्यांहून अधिक परतावा देणारा 'हा' शेअर कोणता?

Multibagger Stock: गुंतवणूकदार 6 महिन्यात करोडपती! 2,46,257 टक्क्यांहून अधिक परतावा देणारा 'हा' शेअर कोणता?

Sel Manufacturing Company Ltd प्रामुख्याने कापडाचा व्यवसाय आहे. कंपनी टॉवेल आणि इतर कपडे तयार करते. कंपनीची स्थापना 1969 मध्ये झाली. त्याचे कॉर्पोरेट कार्यालय लुधियाना येथे आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 मार्च : शेअर बाजारात कमी वेळेत जास्त पैसे कमावता येतात, मात्र जास्त म्हणजे किती? असं विचारलं अनेकांना नीट सांगता येणार नाही. मात्र जर तुम्हाला सांगितले की 6 महिन्यांत तुमचे 30,000 रुपये 7 कोटी रुपये झाले असते तर तुमचा विश्वास बसेल का? अनेकांचा नाही बसणार, मात्र असं घडलं आहे. शेअर बाजारातील एका लिस्टेड शेअरने गुंतवणूकदारांना 6 महिन्यांत 2,00,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. Sel Manufacturing Company Ltd असे या शेअरचे नाव आहे. या शेअरने गेल्या 6 महिन्यांत 2.46 लाख टक्के परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. शेअर बाजारात पडझड सुरु असताना देखील Sel Manufacturing अप्पर सर्किट लगावत होता, यावरून या समभागातील तेजीचा अंदाज लावला जाऊ शकतो. शुक्रवारीही हा शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. मुलीचं भविष्य करा सुरक्षित; केवळ 250 रुपयांपासून करा सुरुवात आणि मिळवा लाखो रुपये 35 पैशांवरु 860 रुपयांवर झेप Sel Manufacturing कंपनीचे शेअर्स सहा महिन्यांपूर्वी NSE वर 35 पैसे (27 ऑक्टोबर 2021 ची बंद किंमत) होते. तर 1 एप्रिल 2022 रोजी बाजार बंद झाल्यावर हे शेअर्स 862.25 रुपयांवर पोहोचले. या कालावधीत, या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 246,257.14 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. यावर्षी 2022 मध्ये हा स्टॉक 44.40 रुपये (3 जानेवारी 2022 ची बंद किंमत) वरून 862.25 रुपये प्रति शेअर वाढला आहे. म्हणजेच या वर्षीही शेअरने गुंतवणूकदारांना 1842 टक्के परतावा दिला आहे. इतकेच नाही तर गेल्या एका महिन्याबद्दल बोलायचे झाले तर हा स्टॉक 165.10 टक्क्यांनी वधारला आहे. LIC प्रीमियम भरण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घसबसल्या ऑनलाईन जमा करा; कसं? गुंतवणूकदार बनले करोडपती SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडच्या आजवरच्या शेअर किंमतीच्या नजर टाकली तर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये 30,000 रुपये प्रति शेअर 35 पैसे या दराने गुंतवले असते, तर आज ही रक्कम 7.39 कोटी रुपयांपर्यंत वाढली असती. तसेच 2022 मध्ये जर एखाद्या गुंतवणूकदाराने 44.40 रुपये प्रति शेअर या दराने 30 हजार रुपये गुंतवले असते, तर आज ते 5.82 लाख रुपये झाले असते. कंपनीचा व्यवसाय काय? Sel Manufacturing Company Ltd प्रामुख्याने कापडाचा व्यवसाय आहे. कंपनी टॉवेल आणि इतर कपडे तयार करते. कंपनीची स्थापना 1969 मध्ये झाली. त्याचे कॉर्पोरेट कार्यालय लुधियाना येथे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात