मुंबई, 3 मार्च : पालक म्हणून आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी योग्य गुंतवणूक (Investment) करणे आवश्यक आहे. मुलगी असेल तर तिच्या शिक्षणासाठी, तिच्या उच्च शिक्षणासाठी आणि नंतर लग्नासाठी लागण्याच्या पैशाचा नियोजन आताच करणे आवश्यक आहे. ही सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करा. मुलींसाठी अनेक बचत आणि गुंतवणूक योजना सध्या उपलब्ध आहेत. परंतु यापैकी सर्वात लोकप्रिय योजना सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojna) आहे. कारण, सर्व सरकारी बचत योजनांपैकी सर्वाधिक व्याज फक्त सुकन्या समृद्धी योजनेवरच मिळते. सरकारने यावेळी सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. सध्या या योजनेवर वार्षिक 7.6 टक्के दराने व्याज दिले जात आहे. सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना ही बचत योजना आहे. या योजनेंतर्गत मुलीचे वय 10 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी खाते उघडावे लागते. या खात्यात किमान गुंतवणुकीची मर्यादा 250 रुपये आहे. तुम्ही जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी ही योजना सुरू करता येते. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत गुंतवणुकीसाठी कर सूट देखील उपलब्ध आहे. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत एका मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येते. जर दोन मुली असतील तर दोघींच्या नावे स्वतंत्र खाते उघडता येईल. Tata च्या ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांची बक्कळ कमाई, दोन वर्षात 2 रुपयांचा शेअर 175 रुपयांवर बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडा सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत खाते उघडू शकता. हे खाते जन्म तारखेपासून 10 वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी उघडता येते. हे खाते फक्त 250 रुपये जमा करून उघडता येते. खाते उघडण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेत एक फॉर्म भरावा लागेल. फॉर्मसोबत मुलीच्या जन्म प्रमाणपत्राची प्रत द्यावी लागेल. यासोबतच मुलाची आणि पालकांची ओळखपत्रे द्यायची आहेत. LIC प्रीमियम भरण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घसबसल्या ऑनलाईन जमा करा; कसं? 21 वर्षांसाठी खाते सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 21 वर्षांसाठी खाते उघडले जाते. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतरही खात्यातून पैसे काढता येतात. जर तुम्ही तुमच्या मुलीच्या खात्यात दरमहा 3000 रुपये गुंतवले आणि जर त्यावर 7.6 टक्के दराने व्याज मिळत असेल, तर 21 वर्षांनंतर तुमच्या मुलीच्या नावे 15 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.