मराठी बातम्या /बातम्या /मनी /

गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी सेबीचं फर्मान, Gold Investment बाबत जारी केले नवे नियम

गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी सेबीचं फर्मान, Gold Investment बाबत जारी केले नवे नियम

डिजिटल सोने हे अन- रेग्युलेटेड म्हणजे अनियमित उत्पादन आहे, त्यामुळे त्यात गुंतवणूक सल्लागारांनी व्यवहार करणे नियमबाह्य असल्याचे सेबीने म्हटले आहे.

डिजिटल सोने हे अन- रेग्युलेटेड म्हणजे अनियमित उत्पादन आहे, त्यामुळे त्यात गुंतवणूक सल्लागारांनी व्यवहार करणे नियमबाह्य असल्याचे सेबीने म्हटले आहे.

डिजिटल सोने हे अन- रेग्युलेटेड म्हणजे अनियमित उत्पादन आहे, त्यामुळे त्यात गुंतवणूक सल्लागारांनी व्यवहार करणे नियमबाह्य असल्याचे सेबीने म्हटले आहे.

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर:  भांडवली बाजार अर्थात शेअर बाजारावर (Share Market)नियंत्रण ठेवणारी संस्था भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड अर्थात सेबी (Sebi) गुंतवणूकदारांच्या हितसंरक्षणासाठी सतत प्रयत्नशील असते. या क्षेत्रातील व्यवहार पारदर्शक, विश्वासार्ह व्हावेत यासाठी नियम आणि मार्गदर्शक तत्वांची आखणी करत असते. याचाच एक भाग म्हणून सेबीने नुकताच एक नवीन नियम जारी केला आहे. तो म्हणजे गुंतवणूक सल्लागारांना डिजिटल सोन्याचे (Digital Gold) व्यवहार करण्यास किंवा असे व्यवहार करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म (Digital Platform) उपलब्ध करून देण्यास मनाई केली आहे. डिजिटल सोने हे अन- रेग्युलेटेड म्हणजे अनियमित उत्पादन आहे, त्यामुळे त्यात गुंतवणूक सल्लागारांनी व्यवहार करणे नियमबाह्य असल्याचे सेबीने म्हटले आहे. काही नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार सोन्यासह अन्य काही अनियमित उत्पादनांची खरेदी-विक्रीचे व्यवहार करत असल्याचे आढळल्याने सेबीने त्यावर आक्षेप घेतला आहे. आता दिवाळी (Diwali)जवळ आली असल्याने सोन्यातील उलाढाल वाढणार हे लक्षात घेऊन सेबीने हे फर्मान काढले आहे. सध्या सोन्याच्या किंमतीत झालेली वाढ पाहता, लोक सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे अनेक गुंतवणूक सल्लागार गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत असून, या गुंतवणुकीसाठी प्लॅटफॉर्मही उपलब्ध करून देत आहेत. यामुळे या अनियमित व्यवहारांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने सेबीने हे पाऊल उचलले आहे. हेही वाचा-  Radhakishan Damani यांच्या पोर्टफोलिओमधील स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला
 यापूर्वी नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात राष्ट्रीय शेअर बाजाराने (NSE)26 ऑगस्ट रोजी आपल्या स्टॉक ब्रोकर्सना (Stock Brokers) (दलालांना) डिजिटल सोन्याचे व्यवहार करण्यास बंदी घातली होती. 10 सप्टेंबरपर्यंत एनएसईच्या प्लॅटफॉर्मवर डिजिटल सोन्याची विक्री थांबवण्याचे निर्देश दलालांसह सदस्यांना देण्यात आले होते. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कारवाईनंतरही काही नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार डिजिटल सोन्यासह अनियमित उत्पादनांच्या खरेदी-विक्रीसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत असल्याचे सेबीच्या निदर्शनास आलं आहे.
गुंतवणूक सल्लागार डिजिटल सोन्यासाठी सल्ला, वितरण किंवा गुंतवणुकीशी संबंधित सेवा देऊ शकत नाहीत. स्टॉक एक्सचेंजच्या सर्व सदस्यांनी सिक्युरिटीज, कमोडिटी, डेरिव्हेटिव्हज व्यतिरिक्त इतर व्यापार करू नये. त्यांचे हे व्यवहार सेबी कायदा 1992 आणि सेबीच्या 2013 च्या नियमांचे उल्लंघन करणारे आहेत. त्यांच्यावर सेबी कायदा 1992 अंतर्गत दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूक सल्लागारांनी अशा अनियमित कामांपासून दूर राहावे असे सेबीने स्पष्ट केले आहे. हेही वाचा-  Stocks to Buy : तीन स्टॉक्स ज्यात येत्या काही आठवड्यात कमाईची संधी
 याच पार्श्वभूमीवर, पेटीएम मनी (Paytm Money)या नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार कंपनीने 10 सप्टेंबर 2021 रोजी सोशल मीडियावरील आपल्या एका पोस्टमध्ये डिजिटल सोने फक्त 'पेटीएम' अ‍ॅपवर (Paytm App)उपलब्ध असेल, पेटीएम मनीवर नाही, असे स्पष्ट केले होते. डिजिटल गोल्ड हे पेटीएम अ‍ॅपवर आहे. पेटीएम अ‍ॅप हे स्टॉक ब्रोकर किंवा गुंतवणूक सल्लागार नाही. यामुळे पेटीएम अ‍ॅपवर डिजिटल गोल्ड खरेदी-विक्री करता येईल.
First published:

Tags: Gold, Sebi

पुढील बातम्या