• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Radhakishan Damani यांच्या पोर्टफोलिओमधील स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला

Radhakishan Damani यांच्या पोर्टफोलिओमधील स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला

मंगलम ऑर्गेनिक्स (mangalam organics ltd) राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफोलिओमधील (Radhakishan Damani Portfolio) स्टॉक खरेदीचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 ऑक्टोबर : राकेश झुनझनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्याप्रमाणेच राधाकिशन दमानी (radhakishan damani) हे देखील शेअर बाजारातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे. मोठ्या गुतंवणूकदारांनी कोणत्याही शेअरमध्ये आपली हिस्सेदारी न बदलणे हे त्या कंपनीवरील त्यांच्या विश्वासाचे लक्षण मानले जाते. मंगलम ऑर्गेनिक्स (mangalam organics ltd) राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफोलिओमधील (Radhakishan Damani Portfolio) एक स्टॉक आहे. मंगलम ऑर्गेनिक्स केमिकल स्टॉकने अलीकडेच ब्रेकआउट दिला आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीचा शेअर 660 रुपयांवरून 780 रुपयांवर पोहोचला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या स्टॉकमध्ये 760 रुपयांचा ब्रेकआउट झाला आहे आणि तो अल्पावधीत 860 रुपये प्रति शेअरपर्यंत जाऊ शकतो. 760 रुपयांची पातळी देखील या स्टॉकसाठी मजबूत सपोर्ट आहे. मंगलम ऑर्गेनिक्सचा शेअर असलेल्या गुंतवणूकदारांना 860 रुपयांचे टार्गेट ठेवण्याचा सल्ला दिला जातो आहे. Stocks to Buy : तीन स्टॉक्स ज्यात येत्या काही आठवड्यात कमाईची संधी तज्ञांचे म्हणणे आहे की हा स्टॉक चार्ट पॅटर्नवर मजबूत दिसत आहे आणि सध्याच्या बाजार भावावर खरेदी केला जाऊ शकतो. यासाठी गुंतवणूकदारांनी 750 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा. 25 ऑक्टोबरपासून मोदी सरकार विकत आहे स्वस्त सोनं, ऑनलाइन खरेदीवर मिळेल सूट मंगलम ऑर्गेनिक्सने यावर्षी चांगले रिटर्न्स दिला आहे. यावर्षी शेअर आतापर्यंत 414 रुपयांपासून 780 रुपये प्रति शेअर झाला आहे, जवळजवळ 90 टक्के वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत शेअर 530 रुपयांवरून 780 रुपयांवर पोहोचला आहे, ज्यात या कालावधीत सुमारे 45 टक्के वाढ आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: