• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Stocks to Buy : तीन स्टॉक्स ज्यात येत्या काही आठवड्यात कमाईची संधी

Stocks to Buy : तीन स्टॉक्स ज्यात येत्या काही आठवड्यात कमाईची संधी

येत्या आठवड्यांत निफ्टीसाठी 18,600 ची लेव्हल महत्वाची असेल. जर निफ्टीने ही लेव्हल वरच्या बाजूस ब्रेक केली तर ग्राफ 19000 च्या दिशेने जाताना दिसेल.

 • Share this:
  मुंबई, 22 ऑक्टोबर : शेअर मार्केटमध्ये (Share Market) योग्य वेळी योग्य स्टॉक खरेदी (Stock to Buy) करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे योग्य टेक्निकल आणि फंडामेंटल अॅनालिसिस करुन योग्य स्टॉक निवडणे हे करणे एक्सपर्टना चांगलं जमतं. गेल्या काही दिवसातील शेअर बाजारवर नजर टाकली तर ते लाल रंगात बंद होतंय. त्यामुळे सध्या बाजारात प्रॉफिट बुकिंग सुरु आहे. दुसरीकडे मोमेंटम इंडिकेटर किमतींमध्ये घसरण संपण्याचे संकेत मिळत आहे. GEPL Capital च्या करण पै (Karan Pai) म्हणाले की, ओपन इंटरेस्ट पाहिला तर निफ्टीमध्ये 19000 च्या कॉलवर सर्वाधिक ओपन इंटरेस्ट दिसत आहेत. त्याचप्रमाणे, 18000 च्या पुट कॉन्ट्रॅक्टमध्ये चांगला सहभाग दिसून येत आहे. यावरुन असे दिसते की निफ्टी 18000 ते 19000 च्या ट्रेड करू शकतो. चार्टवर एक नजर टाकल्यास, असे संकेत मिळत आहेत की बाजार आता 18000-17900 च्या दिशेने वाटचाल करू शकतो. हा झोन निफ्टीसाठी सपोर्ट म्हणून काम करेल. जर ही लेव्हल ब्रेक केली तर निफ्टी 17,600 च्या दिशेने जाताना दिसू शकेल. वरच्या बाजूस, येत्या आठवड्यांत निफ्टीसाठी 18,600 ची लेव्हल महत्वाची असेल. जर निफ्टीने ही लेव्हल वरच्या बाजूस ब्रेक केली तर ग्राफ 19000 च्या दिशेने जाताना दिसेल. Gold Investment: अवघ्या 500 रुपयांत करा सोन्यामध्ये गुंतवणूक, SIP द्वारे खरेदी करा सोनं करण पै यांच्यानुसार तीन स्टॉक जे येत्या काही आठवड्यात चांगले रिटर्न देऊ शकतात बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) हा स्टॉक 95.45 रुपयांवर खरेदी करता येऊ शकतो. तर 85 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदी करता येऊ शकतो. 109 रुपयांचे टार्गेट ठेवत येईल. 2-3 आठवड्यांत हा स्टॉक 28 टक्क्यांनी वाढू शकतो. 25 ऑक्टोबरपासून मोदी सरकार विकत आहे स्वस्त सोनं, ऑनलाइन खरेदीवर मिळेल सूट कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) हा स्टॉक 2,143.75 रुपयांवर खरेदी करता येऊ शकतो. तर 2,050 रुपयांच्या स्टॉप लॉस असेल आणि 2,273 रुपयांचे टार्गेट असेल. 2-3 आठवड्यांत हा स्टॉक 14 टक्क्यांनी वाढू शकतो. युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India) हा स्टॉक 50.65 रुपयांच्या किंमतीवर खरेदी करता येऊ शकतो तर 45 रुपयांच्या स्टॉप लॉस लावता येऊ शकतो. 65 रुपयांचे टार्गेट असेल. 2-3 आठवड्यांत हा स्टॉक 28 टक्क्यांनी वाढू शकतो.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: