मुंबई, 7 नोव्हेंबर: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कोणीही झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट उघडू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या एसबीआय शाखेत जाऊन फॉर्म भरू शकता. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हे खाते कोणतीही व्यक्ती उघडू शकते. त्यासाठी त्याच्याकडे वैध केवायसी कागदपत्र असायला हवीत. मुळात समाजातील गरीब वर्गाला शुल्क किंवा फीचा बोजा न ठेवता बचत करण्यास प्रोत्साहित करणे, हा या अकाउंटचा उद्देश आहे. SBI झिरो बॅलन्स अकाउंट- बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे खाते सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. रुपये शिल्लक ठेवण्याची गरज नाही. त्याला शून्य शिल्लक बचत बँक खाते असेही म्हणतात. तसेच या खात्यात जास्तीत जास्त किती रक्कम ठेवता येईल यावर मर्यादा नाही. मात्र या खात्यावर चेकबुक उपलब्ध नाही. बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी फॉर्म भरावा लागेल किंवा एटीएम वापरता येईल. या सेवा मोफत उपलब्ध-
- तुम्ही तुमच्या खात्यातून एका महिन्यात 4 वेळा पूर्णपणे मोफत पैसे काढू शकता. तुम्ही आधारद्वारेही पैसे काढू शकता.
- रुपे एटीएम-कम-डेबिट कार्ड विनामूल्य उपलब्ध आहे. वार्षिक देखभाल शुल्क आकारले जाणार नाही.
- NEFT/RTGS सारख्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींद्वारे रकमेची पावती/क्रेडिट विनामूल्य असेल. केंद्र/राज्य सरकारने काढलेले धनादेश जमा करणे/संकलन करणे विनामूल्य असेल.
- तुम्ही तुमचं खातं दोन वर्षे वापरत नसल्यास तुमचं खातं डोअरमॅट बनते. अशा परिस्थितीत, तुम्ही कागदपत्र सबमिट करून ते पुन्हा सक्रिय करू शकता.
- सामान्यतः बँक इतर खात्यांमध्ये यासाठी शुल्क आकारते. पण इथे ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. खाते बंद करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारले जात नाही.
हेही वाचा: LICच्या ‘या’ प्लॅनमध्ये करा छोटी गुंतवणूक, लखपती झालाच म्हणून समजा हे खाते कोण उघडू शकते? हे खाते उघडण्यासाठी तुमच्याकडं वैध कागदपत्रे असणं आवश्यक आहे. केवायसीसाठी आधार कार्ड वापरता येईल. ही खाती संयुक्त खातं म्हणूनही उघडता येतात.
या अटी पूर्ण कराव्या लागतील- जर तुमच्याकडे बेसिक बचत बँक ठेव खाते असेल, तर तुम्ही इतर कोणतेही बचत बँक खाते ठेवू शकत नाही. जर एखाद्या ग्राहकाचे आधीच सेव्हिंग अकाउंट असेल तर बेसिक अकाउंट खातं उघडल्यानंतर 30 दिवसांच्या आत जुने खाते बंद करावे लागेल.