मुंबई, 6 नोव्हेंबर: आपल्या देशातील बहुतेक लोक गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि हमी परताव्याचा पर्याय निवडतात. यासाठी लोक एकतर LIC ची योजना घेतात किंवा पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करतात. आज आम्ही तुम्हाला LIC च्या अशा प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही दररोज 71 रुपये वाचवू शकता आणि मॅच्युरिटीवर 48.75 लाख रुपये मिळवू शकता. या वयातील लोक गुंतवणूक करू शकतात- LIC च्या या प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 52 वर्षे असायला हवं. या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे ही योजना अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे की, जेव्हा एखादी सामान्य व्यक्ती त्याच्या करिअरच्या अगदी सुरुवातीस गुंतवणूक करण्यास सुरुवात करते, तेव्हा तो त्याच्या भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करू शकतो. तुमच्या गरजेनुसार कालावधी ठरवा- या योजनेतील परिपक्वता कालावधी 12 ते 35 वर्षे आहे. या योजनेत गुंतवणूक करणारी व्यक्ती त्याच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार त्याच्या योजनेचा कालावधी ठरवू शकते. जर एखादी व्यक्ती त्याच्या करिअरच्या सुरुवातीस असेल तर तो 35 वर्षांच्या कार्यकाळासाठी गुंतवणूक करू शकतो आणि जर एखाद्या व्यक्तीचं वय 45 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तो 12 वर्षांसाठी आपले पैसे गुंतवू शकतो. हेही वाचा: Loan Recovery Rules: कर्जाची परतफेड करू न शकल्यास बँक देणार नाही त्रास, तुम्हाला मिळतात हे अधिकार सोयीनुसार प्रीमियम मोड निवडा- जर तुम्ही 18 वर्षे वयामध्ये 10 लाखांचा सम अॅश्युअर्डसाठी LIC न्यू एंडोमेंट प्लॅन घेतला, ज्याचा कालावधी 35 वर्षांचा असेल, तर तुम्हाला पहिल्या वर्षासाठी 26,534 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागेल, तर दुसऱ्या वर्षी तुम्ही 25**,**962 रुपये प्रीमियम भरावा लागेल. या योजनेअंतर्गत, तुम्ही त्रैमासिक किंवा वार्षिक मोडमध्ये प्रीमियम भरू शकता. या प्रीमियमनुसार, जर तुम्ही दररोज 71 रुपये वाचवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 48.75 लाख रुपये मिळतील. जीवन विमा संरक्षण- जर या योजनेच्या ग्राहकाचा प्लॅनच्या मॅच्युरिटीपूर्वी मृत्यू झाला तर, पॉलिसीधारकाच्या वारसांना विम्याची रक्कम आणि लाइफ कव्हरची रक्कम दिली जाईल. पॉलिसीचा पहिला प्रीमियम भरल्यानंतर हे कव्हर सुरू होते. पॉलिसीधारकाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास, कंपनी वेळ आणि प्रीमियमच्या आधारावर 10,45,000 ते 48,75,000 पर्यंत रक्कम देईल.
मॅच्युरिटीवर मिळेल इतका परतावा - या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला प्रीमियम म्हणून फक्त 9,09,242 रुपये द्यावे लागतील, ज्यावर तुम्हाला मॅच्युरिटीवेळी 48,75,000 रुपये मिळतील.