नवी दिल्ली, 22 मार्च : रोजच्या वापरातील नोटांद्वारे कोरोना व्हायरस (Coronavirus) चं संक्रमण थांबवण्यासाठी सरकारकडून महत्त्वाची पावलं उचलली जाऊ शकतात. एसबीआय रिसर्च (SBI Research) कडून सरकारला असं सुचवण्यात आले आहे की, पेपर करन्सीऐवजी पॉलिमर करन्सीच्या वापर करू शकतो का याचा विचार करावा. ऑस्ट्रेलिया, युके, कॅनडा याठिकाणी पॉलिमर करन्सीचा वापर केला जातो. कोरोनाच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी नोटांऐवजी डिजिटल पेमेंट पद्धती वापरणे गजरेचे आहे, मात्र भारतासारख्या देशात पूर्णपणे डिजिटल होणे शक्य नाही. काही ठिकाणी नोटांचा वापर हा करावाच लागतो. त्यामुळे या कागदी नोटांसाठी पर्याय असणे आवश्यक आहे. पॉलिमर नोटा म्हणजे काय**?** पॉलिमर नोटांना एका सिंथेटिक पॉलिमरपासून बनवण्यात येते, त्याला बायएक्शिअली ओरिएंटेड पॉलिप्रॉपिलीन (biaxially-oriented polypropylene) म्हणतात. यामध्ये मेटामेरिक शाईचा वापर केला जातो. पॉलिमर नोटा जास्त टिकाऊ असतात. त्यांचा वापर सर्वप्रथम रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाने 1988 मध्ये सुरु केला. (हे वाचा- JantaCurfew : आज ही 5 कामं केली नाही तरच मोडेल कोरोनाची कंबर! ) आता कॅनाडा, मालदिव्ह्स, मॉरिशन, निकारागुआ, न्यूझीलंड, पापुआ, न्यू गिनी, रोमानिया, युके, नायजेरिया यांसारख्या देशांमध्ये पॉलिमर नोटांचा वापर करण्यात येतो. नोटांमुळे व्हायरस पसरू नये याकरता पावलं उचलली जाण्याची शक्यता फायनान्शिअल एक्सप्रेसच्या अहवालानुसार, 17 मार्च 2020 रोजी एसबीआय रिसर्चने त्यांच्या इकोरॅप अहवालात सांगितलं की, जरी सावधानता बाळगली तरीही नोटांचा वापर टाळू शकत नाही, त्यामुळे या नोटा व्हायरस पसरवण्यासाठी मुख्य कॅरियर बनू शकतात. त्यामुळे काही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. भारतात देखील अशा नोटांचा वापर सुरू करण्याबाबत विचार करण्यास हरकत नाही. खिशामध्ये असणाऱ्या नोटांमधूनही संक्रमण होण्याची शक्यता गेल्या अनेक दिवसांपासून सरकारकडून डिजिटल पेमेंट पद्धती वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यातच SBI रिसर्चने नोटा आणि त्यावर असणाऱ्या सुक्ष्मजीवांमुळे पसरणारे आजार, यासंदर्भातील अनेक अहवालांबाबत माहिती त्यांच्या अहवालात दिली आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांच्या अहवालानुसार देखील करन्सी नोटांवर सुक्ष्मजीव राहतात, आणि त्यामुळे आजार आणि संक्रमण होण्याची दाट शक्यता असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.