मुंबई, 31 ऑगस्ट: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना यापुढे किरकोळ कामांसाठी बँकेच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. आता ते घरबसल्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बँकेशी संबंधित अनेक कामे मार्गी लावू शकणार आहे. वास्तविक SBI ने आपल्या खातेदारांसाठी एक विशेष सेवा सुरु केली आहे, ज्यामध्ये WhatsApp च्या माध्यमातून अनेक सेवा दिल्या जात आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार, या पाऊलामुळे एकीकडे बँकांमधील लोकांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर या सेवा जलद गतीने लोकांपर्यंत पोहोचवता येतील. काय आहे ही सेवा- बँकेनं आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून काही सेवा देऊ केल्या आहेत. यामध्ये तुमच्या खात्यातील शिल्लक माहितीपासून ते मिनी स्टेटमेंट माहितीपर्यंतची माहिती समाविष्ट आहे. मिनी स्टेटमेंटमध्ये मागील 5 व्यवहारांची माहिती देण्यात येत आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, या सेवा वापरण्यास अतिशय सोप्या आहेत आणि तुम्ही तुमच्या मोबाईलच्या मदतीनं ही माहिती कधीही मिळवू शकता. ही सेवा मिळविण्यासाठी, प्रथम तुम्हाला बँकेकडे सेवेसाठी नोंदणी करावी लागेल. एकदा ही नोंदणी झाली की, ही कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची किंवा नेट बँकिंगमध्ये पुन्हा पुन्हा लॉग इन करण्याची आवश्यकता नाही. हेही वाचा- National Pension System: तिशी गाठली तरी रुपयाचीही बचत नाही? ‘या’ सरकारी योजनेत करा गुंतवणूक मिळेल दीड लाख रुपये पेन्शन
Your bank is now on WhatsApp. Get to know your Account Balance and view Mini Statement on the go. #WhatsAppBanking #SBI #WhatsApp #AmritMahotsav #BhimSBIPay pic.twitter.com/3aXYg1m3l9
— State Bank of India (@TheOfficialSBI) August 29, 2022
Whatsapp द्वारे सेवा कशी मिळवायची?
- व्हॉट्सअॅपद्वारे सेवा मिळविण्यासाठी, तुम्हाला प्रथम नोंदणी करणं आवश्यक आहे.
- नोंदणीसाठी, तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावरून WAREG Space बँक खाते क्रमांक 917208933148 वर पाठवावा लागेल. नोंदणी होताच आपण व्हॉट्सअॅप सेवा वापरण्यास सक्षम असाल.
- ही सेवा मिळवण्यासाठी सर्वप्रथम 909022690226 या whatsapp क्रमांकावर हाय मेसेज पाठवा यासोबतच तुम्हाला बँक खात्याची माहिती मिनी स्टेटमेंट आणि व्हॉट्सअॅप सेवा बंद करण्यासाठी 3 पर्याय मिळेल.
- सूचनांनुसार तुम्हाला ती माहिती मेसेजमध्ये द्यावी लागेल, त्या बदल्यात तुम्ही मागितलेली माहिती मिळेल.