जाहिरात
मराठी बातम्या / मनी / स्कॅम कॉलद्वारे होणारी फसवणूक कशी टाळाल? एसबीआयने दिल्या महत्त्वाच्या टिप्स

स्कॅम कॉलद्वारे होणारी फसवणूक कशी टाळाल? एसबीआयने दिल्या महत्त्वाच्या टिप्स

स्कॅम कॉलद्वारे होणारी फसवणूक कशी टाळाल? एसबीआयने दिल्या महत्त्वाच्या टिप्स

स्कॅम कॉल आल्यानंतर पुन्हा संबंधित नंबरला कॉल करू नका, किंवा अशा स्वरुपाच्या एसएमएसला प्रतिसाद देऊ नका. कारण ते तुमची वैयक्तिक, आर्थिक माहिती चोरून तुमची फसवणूक करू शकतात.’

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 30 ऑक्टोबर: बँक ग्राहक स्कॅम कॉल आल्यानंतर स्वतःची फसवणूक कशी टाळू शकतात, याबाबतच्या टिप्स स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. 25 सेकंदांचा व्हिडिओ शेअर करत त्यात बँकेने म्हटलं आहे की, ‘स्कॅम कॉल आल्यानंतर पुन्हा संबंधित नंबरला कॉल करू नका, किंवा अशा स्वरुपाच्या एसएमएसला प्रतिसाद देऊ नका. कारण ते तुमची वैयक्तिक, आर्थिक माहिती चोरून तुमची फसवणूक करू शकतात.’ एसबीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सायबर गुन्हेगार बँक ग्राहकांना फसवण्याचा कसा प्रयत्न करतात, हे सांगण्यात आलंय. ग्राहकांना अनेकदा फोन येतात की, त्यांचे वीज कनेक्शन कापले जाईल. तसंच ग्राहकांना, “प्रिय ग्राहक, तुमचा वीज पुरवठा आज रात्री 9.30 वाजता वीज कार्यालयातून खंडित केला जाईल. कारण तुमचं मागील महिन्याचं बिल अपडेट झालं नाही. कृपया आमच्या विद्युत कार्यालयाशी त्वरित संपर्क साधा. धन्यवाद," असे एसएमएससुद्धा येतात. पण स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना वीज विभागाच्या नावाने बिल भरण्यासाठी येणाऱ्या फसव्या संदेशांना बळी न पडण्याचं आवाहन केलं आहे. हेही वाचा - Fixed Deposit: ‘या’ बँकेनं वाढवले एफडीवरील व्याजदर, ग्राहकांची होणार चंगळ यापासून रहा सावधान - कोणत्याही फोन नंबरवरून किंवा बँकेच्या अधिकृत आयडीवरून न आलेल्या एसएमएसपासून सावध रहा. - एखाद्या नंबरवरून कॉल करून तुम्हाला त्वरित कार्यवाही करण्यास सांगत असल्यास सावध रहा. - शुद्धलेखन किंवा व्याकरणाच्या चुका असलेल्या कोणत्याही एसएमएसकडे दुर्लक्ष करा. - कोणताही व्यवहार करण्यापूर्वी अकाउंट व्हेरिफाय करणं आवश्यक आहे. एसबीआयने व्याजदरात केली वाढ दुसरीकडे, एसबीआय आणि बँक ऑफ इंडियासह अनेक वित्तीय संस्थांनी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर त्यांचे व्याजदर वाढवले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी द्विमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेट रेपो 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्के केला आहे. तसंच होम लोनमधील कंपनी एचडीएफसी लिमिटेडने मागील शुक्रवारी कर्जावरील व्याजदरात 0.50 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. व्याजदरात वाढ झाल्याने एचडीएफसी होम लोन घेतलेल्यांचा ईएमआय वाढला आहे. होम लोन व्याजावर बँक देत आहे सवलत सणासुदीच्या काळात एसबीआय होम लोन घेण्याऱ्यांना व्याजात सूट देत आहे. नवीन घरखरेदी करणारे ग्राहक 31 जानेवारी 2023 पर्यंत या सवलतीचा लाभ घेऊ शकतात. या ऑफरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया होम लोनवर 0.30 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. एसबीआयच्या होमलोनचे व्याजदर 8.55 टक्के ते 9.05 टक्के आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: SBI , scam
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात