मुंबई, 30 ऑक्टोबर: सणासुदीचा हंगाम संपण्यापूर्वी ICICI बँकेनं आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. ICICI बँकेनं आपल्या स्पेशल सीनियर सिटीझन एफडी स्कीम गोल्डन इयर्स FD वरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे. बँकेनं या योजनेत मिळणाऱ्या व्याजात 10 बेसिक पॉइंटनं वाढ केली आहे. ICICI बँकेनं जारी केलेल्या माहितीनुसार बँकेच्या गोल्डन इयर्स एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून वार्षिक 0.50 टक्के अतिरिक्त दरानं 0.20 टक्के अधिक व्याज दिले जाईल. यामुळं या फिक्स्ड ठेव योजनेत म्हणजेच बचत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना फायदा होणार आहे. आयसीआयसीआय बँकेनं आपल्या अधिकृत वेबसाईटवरून ही माहिती दिली आहे. यापूर्वी ICICI बँक गोल्डन इयर्स FD साठी अतिरिक्त व्याज दर वार्षिक 0.10 टक्के होता. वाढीव व्याजदर आजपासून लागू झाला आहे. व्याजदरातील बदलानंतर ज्येष्ठ नागरिकांना गोल्डन इयर्स एफडी योजनेअंतर्गत 6.95 टक्के व्याज मिळेल. हे व्याज 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वर दिले जात आहे. योजना 7 एप्रिल 2023 पर्यंत वाढवली- ICICI च्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या माहितीनुसार, बँकेनं विशेष FD योजना 7 एप्रिल 2023 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी या योजनेची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2022 होती. या महिन्यात बँकेनं एफडीच्या व्याजदरात वाढ करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यातच बँकेनं एफडीच्या व्याजदर 50 बेसिक पॉइंट्सनं वाढ केली होती. हेही वाचा: EPS Rules: प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांनाही मिळेल पेन्शन, गॅप पडला तरीही मिळेल लाभ, वाचा डिटेल्स
मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढता येतात- या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मुदतपूर्तीपूर्वीच एफडीमधून पैसे काढण्याचा पर्याय दिला जात आहे. बँक यासाठी गुंतवलेल्या रकमेत 1.10 टक्के कपात करेल. यासोबतच प्री-मॅच्युरिटीचे सर्व नियम त्यावर लागू होतील. ICICI बँकेने मे 2020 मध्ये सुरू केलेली गोल्डन इयर्स FD योजना गेल्या दोन वर्षांत अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी एफडी योजनांचे व्याजदर वाढवले आहेत.