नवी दिल्ली, 31 जुलै: कोरोनामुळे लोकांच्या बाहेर पडण्यावर बरेच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशात कित्येक कंपन्या आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त ऑनलाइन किंवा घरपोच सुविधा देण्यावर भर देत आहेत. यामध्ये बँकिंग सुविधांचाही समावेश आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजेच एसबीआयदेखील (SBI) आपल्या ग्राहकांना कित्येक ऑनलाइन सुविधा पुरवते. यामध्येच डेबिट कार्ड म्हणजेच एटीएम कार्डही घरपोच पोहोचवले जाते; मात्र काही वेळा हे कार्ड आपल्या घरी पोहोचत नाही. मग अशा परिस्थितीत काय करायचं, हे एसबीआयने स्पष्ट केलं आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना ऑनलाइन बँक खातं उघडण्याची सुविधा पुरवते. यासोबतच, पेपरवर्कची गरज पडल्यास, कागदपत्रं पोस्टाने घरपोच पोहोचवण्याचा पर्यायही एसबीआय अवलंबते. कागदपत्रांसोबतच डेबिट कार्डही पोस्टाने ग्राहकांच्या पत्त्यावर पाठवलं जातं; मात्र कित्येक वेळा तांत्रिक अडचणींमुळे ते ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आपलं कार्ड कशा प्रकारे मिळवू शकाल याबाबत बँकेचे काही नियम आहेत. (Find Debit Card) हे वाचा- तुमच्या जीवनावर थेट परिणाम करणारे हे 7 नियम बदलणार, उद्यापासून लागू होणार बदल काही दिवसांपूर्वीच एसबीआयच्या एका ग्राहकासोबत अशीच गोष्ट घडली. आपलं डेबिट कार्ड घरी पोहोचलं नसल्यामुळे, त्या ग्राहकाने ट्विटरच्या माध्यमातून एसबीआयला याबाबत माहिती दिली. त्यावर एसबीआयने असं उत्तर दिलं की, ‘प्रिय ग्राहक, तुमचं डेबिट कार्ड भारतीय पोस्ट खात्याच्या माध्यमातून पोहोचवलं जातं. त्यामुळे ते कुठपर्यंत पोहोचलं आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही कृपया आपल्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा.’
Dear Customer, please note that the debit card is delivered by India Post. We recommend you to get in touch with your post office to know the exact status of delivery. Further, please note that ATM cards which are returned or marked undelivered by the post office, are (1/3)
— State Bank of India (@TheOfficialSBI) July 23, 2021
पुढे एका ट्विटमध्ये एसबीआयने म्हटलं आहे की, ‘पोस्ट ऑफिसमधून परत आलेलं किंवा डिलिव्हर न झालेलं डेबिट कार्ड सुरक्षेच्या कारणास्तव बँकेकडून ब्लॉक करण्यात येतं. यानंतर ते कार्ड बँकेच्या शाखेत पाठवलं जातं. तिथून ग्राहक ते कलेक्ट करू शकतात. या सर्व प्रक्रियेला साधारणपणे 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे (पोस्ट ऑफिसमधून माहिती न मिळाल्यास) डेबिट कार्ड (SBI Debit Card) मिळवण्यासाठी आपली केवायसी डॉक्युमेंट्स घेऊन बँकेच्या शाखेत संपर्क साधावा.’ हे वाचा- Gold Price Today: 7000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं, आता खरेदी केल्यास होईल फायदा दरम्यान, आपलं डेबिट कार्ड हरवल्यास किंवा गहाळ झाल्यास 1800 4253 800 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधणं आवश्यक आहे. या क्रमांकावर फोन केल्यानंतर कार्ड हरवल्याची माहिती देऊन ते ब्लॉक करण्यास सांगणं आवश्यक आहे. या प्रक्रियेदरम्यान आपल्या तक्रारीचा तिकीट नंबर लिहून घेणंही आवश्यक आहे.