नवी दिल्ली, 31 जुलै: तुम्हाला जर सोन्याच्या खरेदी करायची असेल तर आता तुमच्याकडे चांगली संधी आहे. आता सोन्यात गुंतवणूक केल्यास भविष्यात तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. जुलैच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी (30 जुलै) शुक्रवारी सोन्याचांदीचे दर (
Gold-Silver Rate) वाढले आहेत. कॉमेक्सवर सोनं (
Gold rate) जवळपास सहा आठवड्यातील सर्वोच्च स्तरावर आहे. तर एमसीएक्सवर (
MCX) पुन्हा एकदा सोन्याचे दर 48,000 रुपये प्रति तोळापेक्षा जास्त आहेत. असं असूनही सोन्याचे दर सर्वोच्च स्तरापेक्षा साधारण 7831 रुपयानी स्वस्त आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56254 रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचले होते. त्यावेळी सोन्याचे दर ऑल टाइम हायवर होते. डॉलरमधील कमजोरीमुळे सोन्याला विशेष सपोर्ट मिळत आहे.
कॉमेक्सवर सोनं जवळपास सहा आठवड्यातील सर्वोच्च स्तरावर आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (
Multi Commodity Exchange) दर 48,300 रुपये प्रति तोळापेक्षा जास्त आहेत. डॉलरमध्ये कमजोरी, फेडरल रिझर्व्हची नरमाईची भूमिका यामुळे सोन्याला सपोर्ट मिळत आहे. दुसऱ्या सहामाहीत भारतात मागणी वाढण्याची शक्यता आहे. पहिल्या सहामाहीत भारताची मागणी पाच वर्षातील सरासरीपेक्षा 35% कमी आहे. मार्केट एक्सपर्ट सोन्यामध्ये गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ असल्याचे सांगतात. कारण दिवाळीपर्यंत सोनं महाग होण्याची शक्यता अधिक आहे, त्यामुळे आता केलेली खरेदी तुम्हाला भविष्यात फायद्याची ठरेल.
हे वाचा-सरकारच्या या योजनेत 210 रुपये जमा करुन दरमहा ₹5000 पर्यंतचा फायदा, वाचा सविस्तर
शुक्रवारी चांदी 232 रुपये प्रति किलोने वाढून 68113 रुपये झाली आहे. सराफा बाजारात स्पॉट गोल्डची किंमत 65 रुपयांनी वाढून 48423 रुपये प्रति तोळा झाली आहे. असं असलं तरी सोनं ऑल टाइम हायपेक्षा 7000 पेक्षा जास्त किंमतींनी कमी आहे.
EMI वर खरेदी करा स्वस्त सोनं
EMI वर सोनंखरेदीचा पर्याय उत्तम ठरू शकतो. तुम्हाला एखादा दागिना आवडला असेल पण पैसे कमी पडत असतील तर AUGMONT तुम्हाला EMI वर दागिने खरेदी करण्याचा पर्याय देत आहे. Augmont तुम्हाला EMI वर दागिने खरेदी करण्याचा पर्याय देत आहे.
हे वाचा-सामान्यांच्या खिशाला चाप! दुपटीनं महागलं खाद्यतेल, काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?
याकरता तुम्हाला सुरुवातीला 20% डाउन पेमेंट करावे लागेल. 20 टक्के पेमेंटनंतर तुमचा EMI किती होईल ते निश्चित केले जाईल. कॉस्ट ईएमआय पेमेंटच्या 10 दिवसात डिलिव्हरी केली जाईल. कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी अशाप्रकारे EMI वर दागिने खरेदी करणं एक चांगला पर्याय ठरू शकतो. याकरता ग्राहकांना कोणतंही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.