नवी दिल्ली, 06 जुलै: तुम्ही थोडी जोखीम पत्करून गुंतवणूक करण्यास तयार असाल, तर शेअर बाजारात तुमच्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही यामध्ये गुंतवणूक करून एफडीच्या दुप्पट कमाई करू शकता. बाजारात आजपासून IIFL FINANCE च्या Unsecured NCD चं सब्सक्रिप्शन सुरू झालं आहे. या Unsecured NCDचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 10 टक्के व्याज दिलं जात आहे. अर्थात, त्यासाठी कमीत कमी 75 कोटींची गुंतवणूक करावी लागेल. NCD बद्दल IIFL चे Group Chairman निर्मल जैन आणि IIFL Home Finance चे ED आणि CEO Monu Ratra यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. IIFL FINANCE च्या Unsecured NCD बद्दल जाणून घेऊ या.
NCD (Non Convertible Debentures) आज, 6 जुलैला सुरू झाला असून, 8 जुलै रोजी बंद होणार आहे. यामध्ये 1000 रुपये किमतीचे 100 कोटी रुपयांचे NCD जारी केले जाणार आहेत. यासोबतच 900 कोटी रुपयांच्या ओव्हरसब्सक्रिप्शनचा पर्यायदेखील आहे. या NCDमध्ये कमीत कमी 75 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यावर 10 टक्के व्याज मिळेल. या NCDतून मिळालेल्या रकमेतल्या 75 टक्के रकमेचा वापर लेंडिंग, फायनान्सिंगमध्ये होईल आणि उर्वरित 25 टक्के रक्कम कंपनीच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाईल. या NCD ला CRISIL ने AA स्टेबल रेटिंग दिलं आहे.
हे वाचा - SBI Alert : केवळ एक SMS करेल तुमचं खातं रिकामं, बँकेने ग्राहकांना दिला इशारा
या एनसीडीवर बोलताना कंपनीच्या व्यवस्थापनाने 'सीएनबीसी-आवाज'ला सांगितलं, की, या इश्यूचा साइज 1000 कोटी रुपये आहे. यातून मिळणारी रक्कम टियर -2 कॅपिटलसाठी राहील. ज्या भागात अनलॉक होईल त्या भागात येत्या काळात आतापेक्षा जास्त रिकव्हरी दिसेल, असं कंपनी मॅनेजमेंटने अर्थव्यवस्थेविषयी बोलताना सांगितलं.
मॅनेजमेंटने पुढे सांगितलं, की IIFL लोनमध्ये जास्त पोर्टफोलिओ होम लोनचा आहे. पूर्ण ग्रुपमध्ये होम लोन आणि गोल्ड लोनचं योगदान जास्त आहे. कंपनीची अॅसेट क्वालिटी चांगल्या स्थितीत आहे. नेट NPA 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. PSU बँक आणि NBFCs च्या तुलनेत अॅसेट क्वालिटी मजबूत आहे. बाजाराबद्दल बोलताना निर्मल जैन म्हणाले, की गुंतवणुकीसाठी अॅसेट अॅलोकेशनवर लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच चांगला परतावा मिळण्यासाठी इक्विटी, गोल्ड, रिअल इस्टेट, बँक एफडी अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये गुंतवणूक करावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Savings and investments