मराठी बातम्या /बातम्या /मनी /

स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी SBI ची खास योजना, फिक्स डिपॉझिटवर मिळणार अधिक व्याजदर

स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी SBI ची खास योजना, फिक्स डिपॉझिटवर मिळणार अधिक व्याजदर

उत्सव FD योजनेवर, SBI 1,000 दिवसांच्या ठेवींवर 6.10% व्याज दर देत आहे. आणि ज्येष्ठ नागरिक नियमित दरापेक्षा 0.50% अतिरिक्त व्याजदर मिळवण्यास पात्र असतील.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 16 ऑगस्ट : देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्ताने देशाने स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सव म्हणून साजरा केला. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 'उत्सव डिपॉझिट' नावाची योजना सुरू केली आहे. या फिक्स्ड डिपॉझिट स्कीममधील व्याजदर सामान्यपेक्षा जास्त आहेत आणि ते मर्यादित काळासाठीच उपलब्ध आहेत. एसबीआयने ट्विटद्वारे म्हटले आहे की, 'तुमच्या पैशांना तुमच्यासाठी कठोर परिश्रम करू द्या. तुमच्या मुदत ठेवींवर उच्च व्याजदरासह 'उत्सव' डिपॉझिट सादर करत आहोत. उत्सव FD योजनेवर, SBI 1,000 दिवसांच्या ठेवींवर 6.10% व्याज दर देत आहे. आणि ज्येष्ठ नागरिक नियमित दरापेक्षा 0.50% अतिरिक्त व्याजदर मिळवण्यास पात्र असतील. हे दर 15 ऑगस्ट 2022 पासून लागू आहेत आणि प्लॅन 75 दिवसांच्या कालावधीसाठी वैध आहे. टाटा समूहाच्या 'या' शेअरमुळे काही गुंतवणूकदार मालामाल तर काहींचं मोठं नुकसान, वर्षभरात नेमकं काय घडलं? दोन दिवसांपूर्वी व्याजदर जाहीर एसबीआयमध्ये नुकतीच 2 कोटींखालील मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. SBI ने 13 ऑगस्ट 2022 रोजी नवीन व्याजदर जाहीर केले. बँकेने विविध कालावधीसाठी व्याजदर 15 बेसिस पॉईंट्सने वाढवले आहेत. होम लोन महाग झाल्यावर ग्राहकांना कर्जाचा कालावधी वाढवाव की EMI? तज्ज्ञांच्या मते काय योग्य? SBI ने 180 ते 210 दिवसात मुदत ठेवींवरील व्याजदर 4.40% वरून 4.55% पर्यंत वाढवले ​​आहेत. SBI ने मुदत ठेवींसाठी एक वर्षापासून दोन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या व्याजदरात 5.30% वरून 5.45% पर्यंत वाढ केली आहे. 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीतील ठेवींवरील व्याजदर 5.35% वरून 5.50% पर्यंत वाढला आहे, तर 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर 5.45% वरून 5.60% पर्यंत वाढला आहे. SBI ने व्याजदर वाढवला आहे. 5 वर्षे आणि 10 वर्षे मुदतीच्या ठेवींवर व्याजदर 5.50 टक्क्यांवरून 5.65 टक्के केला आहे.
First published:

Tags: Fixed Deposit, SBI bank, State bank of india

पुढील बातम्या