दोन दिवसांनी मारुती सुझुकी कार होणार 'इतक्या' स्वस्त

Maruti Suzuki -मारुती सुझुकीच्या किमती कमी होणार आहेत. जाणून घ्या त्याबद्दल

News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2019 05:35 PM IST

दोन दिवसांनी मारुती सुझुकी कार होणार 'इतक्या' स्वस्त

मुंबई, 24 सप्टेंबर : सरकारनं काॅर्पोरेट टॅक्स कमी केल्यानंतर देशाची सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी आपल्या सर्व कार्स स्वस्त करणार आहेत. तुम्हाला मारुतीची नवी कार खरेदी करायची असेल तर पुढचे 2 दिवस थांबा. कारण पुढच्या 2 दिवसांत कंपनी याबद्दल घोषणा करणार आहे.

याबद्दल मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव म्हणाले, कारच्या किमती वाढल्यानं खरेदी कमी झालीय. म्हणून ग्राहकांना परवडू शकतील अशा किमतीत कार विकण्याचा निर्णय लवकरच होणार आहे. त्याबद्दलची घोषणा 1-2 दिवसांत होणार आहे.

तुमच्या PF अकाउंटमध्ये लवकरच येणार जास्त पैसे, 'असं' तपासा तुमचं खातं

एका बाजूला मारुती सुझुकी कार्सच्या किमती कमी करण्याचा विचार सुरू आहे खरा. पण दुसऱ्या कार कंपन्या कारच्या किमती कमी करण्याचा कसलाच विचार करत नाहीय. हुंदयू, टोयाटो आणि होंडा या कंपन्यांचं म्हणणं असं की, ते अगोदरच ग्राहकांना चांगल्या ऑफर्स देतायत. त्यामुळे त्या पैसे कमी करण्याची शक्यता नाही.

खूशखबर : मोदी सरकार कराबद्दल करणार मोठी घोषणा; सामान्यांना दिलासा?

Loading...

देशात गेले 10 महिने कार्सची विक्री कमी झालीय. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर या संस्थेनं सांगितलं की वाहनांच्या विक्रीत 23.55 घसरण झालीय. ऑगस्टमध्ये 18,21,490 युनिट विक्री झालेली. गेल्या महिन्यात 23,82,436 युनिट होती. आता दसरा- दिवाळीच्या काळात कार कंपनी विक्री वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाय करणार आहेत.

पेट्रोल आणि सोनं दोन्हीही महाग, राज्यातल्या या शहरात पेट्रोलचे दर सगळ्यात जास्त

मेमध्ये बाजारात मारुती सुझुकी इंडियाच्या कार्सनी बाजी मारली. देशात प्रवासी वाहनांच्या विक्रीत एप्रिलमध्ये घसरण पाहायला मिळालीय. ऑक्टोबर 2011नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. प्रवासी वाहनांच्या घरच्या बाजारातली विक्री एप्रिलमध्ये 17.07 टक्के घसरून ती 2,47,541 झालीय. याआधी 2018मध्ये 2,98,504 प्रवासी वाहनांची विक्री झाली. आॅक्टोबर 2011नंतर प्रवासी वाहन क्षेत्रात विक्रीत सर्वात जास्त घसरण झालीय.आॅक्टोबर 2011मध्ये विक्रीत 19.87 टक्के घसरण नोंदवली गेलीय.

SPECIAL REPORT: भाजपच्या मेगाभरतीला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर, सत्ताधाऱ्यातील नाराजांना आमंत्रण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2019 05:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...