मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI ग्राहकांना मोठा दिलासा! व्याजदर कमी करण्याची घोषणा; नवे दर आजपासून लागू

SBI ग्राहकांना मोठा दिलासा! व्याजदर कमी करण्याची घोषणा; नवे दर आजपासून लागू

SBI ने आपले व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे. स्टेट बँकेच्या या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. अनेक प्रकारच्या कर्जांचा मासिक हप्ता (EMI)कमी होणार आहे.

SBI ने आपले व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे. स्टेट बँकेच्या या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. अनेक प्रकारच्या कर्जांचा मासिक हप्ता (EMI)कमी होणार आहे.

SBI ने आपले व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे. स्टेट बँकेच्या या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. अनेक प्रकारच्या कर्जांचा मासिक हप्ता (EMI)कमी होणार आहे.

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : देशातली सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपले व्याजदर (Interest Rate) कमी करण्याची घोषणा केली आहे. हे नवीन दर आज, 15 सप्टेंबर 2021 पासून लागू झाले आहेत. स्टेट बँकेच्या या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. कर्जाचे व्याजदरही (Loan Interest rates) कमी झाल्याने गृह कर्ज (Home Loan), वाहन कर्ज (Vehicle Loan), वैयक्तिक कर्जासह (Personal Loan) अनेक प्रकारच्या कर्जांचा मासिक हप्ता (EMI)कमी होणार आहे. त्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

स्टेट बँकेने बेस रेटमध्ये एक बेसिस पॉइंट (Basis Point) म्हणजेच 0.05 टक्के कपात केली आहे. त्यामुळे या कपातीनंतर नवीन व्याजदर 7.45 टक्के झाला आहे. याशिवाय बँकेने प्राइम लेंडिंग रेटमध्ये (PLR) 0.05 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीएलआर 12.20 टक्के झाला आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये स्टेट बँकेने गृहकर्जाचा दर 6.70 टक्के केला होता. यासोबतच महिला ग्राहकांना 0.05 टक्के अतिरिक्त सूट देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गृहकर्जदारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यामुळे मासिक कर्जाच्या हप्त्यात काहीशी घट होणार आहे. कोरोना संकटामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या अनेक ग्राहकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी, PF Account चं हे काम करा लगेच, अन्यथा येईल समस्या

त्याचप्रमाणे आता हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याने अनेक जण घर घेण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं विचार करू लागले आहेत. त्यामुळे नवीन गृह कर्जदारांनाही घटत्या व्याजदराचा लाभ घेता येणार आहे. याचा फायदा रिअल इस्टेट क्षेत्रालाही होणार आहे. कोरोना संकटाचा फटका बसलेल्या या क्षेत्राला यामुळे चालना मिळेल.

खास महिलांसाठी LIC 'ही' पॉलिसी, जी देते लाखोंचा लाभ

अर्थात ठेवींचे व्याजदरही यामुळे कमी होणार आहेत. त्यामुळे नवीन ठेवीदारांना ठेवींवर कमी व्याजदराने व्याजाचा लाभ मिळणार आहे. स्टेट बँकेने निश्चित केलेला व्याजदर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) निश्चित केलेल्या बेस रेटवर आधारित आहे. बेस रेट हा किमान व्याज दर असतो. याच्यापेक्षा कमी व्याजदराने कोणतीही बँक कर्ज देऊ शकत नाही. रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेला सध्याचा आधार दर अर्थात बेस रेट 7.30 ते 8.80 टक्के आहे. जुलै 2010 नंतर घेतलेली सर्व गृहकर्जं आधार दराशी जोडलेली आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेला सध्याचा एमसीएलआर (MCLR) दर 6.55-7.00 टक्के आहे. यावरूनच व्याजाचे दर निश्चित केले जातात. त्यामुळे सर्व बॅंकांच्या व्याजदरात फार मोठा फरक नसतो. याचा लाभ कर्जदारांना होतो. सध्याच्या काळात तर कर्जदारांसाठी ही दिलासादायकच बातमी आहे. आता इतर बँकाही व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: SBI, Sbi account, Sbi home loan