मुंबई : भारतातील तीन बँका अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या आहेत. या बँका बुडाल्या तर भारत सरकारला परवडणार नाही. RBO या बँकांची एक D-SIB लिस्ट तयार करते आणि त्याबाबतचे काही नियम देखील असतात. नेमकं काय आहे हे आणि आपली बँक सुरक्षित आहे की नाही हे कसं ठरवलं जातं समजून घेऊया.
गेल्या आठवडाभरात अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक या दोन बँका बुडाल्या आहेत. तिसरी बँक म्हणजेच फर्स्ट रिपब्लिक बँक इतर मोठ्या बँकांनी 30 अब्ज डॉलर्सची मदत देऊन वाचवली आहे.
अमेरिकन बँका बुडवल्याचा भारताच्या बँकिंग व्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नसला तरी एकामागून एक बँका बुडण्याच्या या घटनांमुळे लोकांची चिंता वाढली आहे. आपली बँक कधी बुडाली तर आपल्या पैशाचे काय होईल अशी भीती लोकांना वाटते? असे झाल्यास सरकार पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देते.
बँका बुडण्याचं प्रमाण वाढतंय तुमच्या कष्टाचे पैसे बँकेत किती सुरक्षित?
तुम्हाला माहिती आहे का की भारतात अशा तीन बँका आहेत ज्या इतक्या मोठ्या आहेत की त्या बुडू शकत नाहीत. अशा बँकांना D-SIB म्हणतात. RBI ने ICICI बँक, SBI आणि HDFC बँकेचा D-SIB च्या लिस्टमध्ये समावेश केला आहे.
D-SIB म्हणजे नेमकं काय?
या बँका सरकारच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. कारण या बँका बुडनं म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्यासारखं आहे. त्यामुळे आर्थिक संकट आणि दहशतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. २०१६ मध्ये केवळ SBI बँकेचा या लिस्टमध्ये समावेश होता. आता ICICI आणि HDFC यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे तुमचं या बँकांमध्ये खातं असेल तर निर्धास्त राहा. घाबरण्याचं काही कारण नाही. या बँका सर्वात जास्त सुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. ज्यांचं या बँकांमध्ये खातं नाही त्यांनी या बँकेत खातं उघडण्याचा विचार करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank services, Bank statement, Rbi, Rbi latest news