मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या देशातल्या सर्वांत मोठ्या बँकेने दिवाळीपूर्वी 46 कोटींहून अधिक ग्राहकांना बंपर गिफ्ट दिलं आहे. बँकेनं मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिटवरच्या (FD) व्याजदरात 80 बेसिस पॉइंट्सनं वाढ केली. ही वाढ सर्व मुदत कार्यकाळांसाठी (Tenures) करण्यात आली आहे. नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ‘एफडी’वर लागू होईल. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, वाढलेले व्याजदर 22 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात येतील. दरम्यान, याचा सर्वांत जास्त फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. याशिवाय, एसबीआय त्यांच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना ‘एफडी’वर 1 टक्का अतिरिक्त व्याज देते. एसबीआय बँक पेन्शनधारकांना 5 ते 10 वर्षांच्या मुदतीसाठी असणाऱ्या एफडीवर 7.65 टक्के दरानं व्याज देते. असे असतील ‘एफडी’वरचे नवे व्याजदर एसबीआय बँकेनं 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी मुदतीसाठी असलेल्या एफडीचा व्याजदर 80 बेस पॉइंट्सनी वाढवला असून, तो आता 5.50 टक्के झाला आहे. पूर्वी तो 4.70 टक्के होता. 180 दिवस ते 210 दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर बँक 4.65 टक्के दरानं व्याज देत आहे. याशिवाय, 2 वर्षं ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदतीवरच्या एफडीचे व्याजदर 5.65 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. 46 दिवस ते 179 दिवसांच्या मुदतीसाठी व्याजदर 50 बेसिस पॉइंट्सनी वाढवण्यात आले असून, तो आता 4.50 टक्के झाला आहे. 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी असणाऱ्या एफडीचा व्याजदर 5.60 टक्क्यांवरून 6.10 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलाय. तुम्हीही डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचा विचार करताय? किती आहे रिस्क पाहा या बँकेत 3 वर्षं ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीसाठी असणाऱ्या एफडीवर 6.10 टक्के दरानं व्याज मिळेल. 5 वर्षं ते 10 वर्षांच्या एफडीवर 6.10 टक्के दरानं आणि 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवरही 6.10 टक्के दरानं व्याज दिलं जाईल. 7 दिवस ते 45 दिवसांच्या मुदतीसाठी व्याजदर 3 टक्के राहील. ज्येष्ठ नागरिकांना फायदा ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षं आणि 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6.90 टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. 6 टक्के व्याज 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी मुदतीसाठी असणाऱ्या एफडीवर दिलं जात आहे. 3 वर्षं ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीसाठी असणाऱ्या एफडीवर 6.60 टक्के दरानं व्याज मिळेल. याशिवाय, 2 वर्षं ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी असणाऱ्या एफडीवरच्या व्याजदरात 50 बेस पॉइंट्सनी वाढ केल्यानं तो आता 6.15 टक्क्यांवरून 6.75 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. रुपयाचं मूल्य दिवसेंदिवस घसरत आहे यामागे नेमकं काय कारण? तुमच्यावर त्याचा परिणाम कसा होणार ज्येष्ठ नागरिकांना 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीसाठी असणाऱ्या एफडीवर 6.10 टक्के ते 6.60 टक्के आणि 46 दिवस ते 179 दिवसांच्या मुदतीसाठी 4.5 टक्क्यांऐवजी 5 टक्के दरानं व्याज मिळेल. 7 दिवस ते 45 दिवसांच्या मुदतीसाठी ठेवण्यात आलेल्या एफडीवर 3.50 टक्के दरानं व्याज मिळेल.
वुई-केअर योजनेचा कालावधी वाढवणार एसबीआय बँक त्यांच्या ‘एसबीआई वुई-केअर डिपॉझिट स्कीम’चा (SBI WECARE Deposit Scheme) कालावधी 31 मार्च 2023 पर्यंत वाढवणार आहे. याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षं किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी असणाऱ्या ठेवींवर 30 बेस पॉइंट अतिरिक्त प्रीमियम व्याज मिळतं. पाच वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर सामान्य नागरिकांपेक्षा 0.50 टक्के अधिक व्याज मिळेल. तसंच, ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या रिटेल मुदत ठेवींवर 0.80 टक्के (0.50 +0.30) अधिक व्याज मिळेल.