मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Instant Loan Appsमुळं लागेल वाट, SBIनं दिला महत्त्वाचा अलर्ट

Instant Loan Appsमुळं लागेल वाट, SBIनं दिला महत्त्वाचा अलर्ट

Instant Loan Appsमुळं लागेल वाट, SBIनं दिला महत्त्वाचा अलर्ट

Instant Loan Appsमुळं लागेल वाट, SBIनं दिला महत्त्वाचा अलर्ट

Instant Loan Apps: बनावट कर्ज अ‍ॅपबाबत नेहमी सावधगिरी बाळगा. यामुळे तुमच्यासोबत फसवणूक होऊ शकते. तुमचं मोठं नुकसान होऊ शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 24 नोव्हेंबर: लोकांना आर्थिक गरज भागवण्यासाठी कर्जाची गरज भासते. बँका, NBFC किंवा इतर वित्तीय संस्था किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून कर्ज घेतलं जातं. पण अनेक वेळा मार्केटमधील फेक लोन अ‍ॅपच्या जाळ्यातही लोक फसतात. या बनावट लोन अ‍ॅप्सच्या माध्यमातून लोकांची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. या फसवणूकीपासून लोकांना वाचता यावं म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियानं (एसबीआय) असे बनावट लोन अ‍ॅप टाळण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच ती कशी  टाळायची याच्या काही महत्त्वाच्या पद्धतीही सांगितल्या आहेत. एसबीआयच्या या सल्ल्यानं तुम्ही इन्स्टंट लोन अ‍ॅपच्या फसवणुकीपासून वाचाल.

या सुरक्षा टिप्स ठेवा लक्षात-

तुम्ही इन्स्टंट लोन अ‍ॅप डाउनलोड करत असाल तर ते इन्स्टॉल करण्यापूर्वी त्याची सत्यता नीट तपासा. तसेच, कोणत्याही संशयास्पद लिंकवर कधीही क्लिक करू नका. तुमचा डेटा चोरू शकणारे कोणतेही अनधिकृत अ‍ॅप वापरू नका. तसेच, तुमचा डेटा चोरीला जाऊ नये म्हणून फोनची अॅप पर्मिशन सेटिंग्ज तपासा. तसेच तुमच्या स्थानिक पोलिसांना संशयास्पद कर्ज देणार्‍या अ‍ॅपबद्दल माहिती द्या.

हेही वाचा: विवाहित जोडप्यांसाठी बेस्ट प्लॅन! प्रतिमहा गुंतवा फक्त 200 रुपये अन् दरवर्षी मिळवा 72,000 रुपये

लाखो रुपये देण्याचा दावा-

इन्स्टंट लोन अ‍ॅप्स लोकांना लाखो रुपये देण्याचा दावा करतात. पण पहिल्यांदाच हे अॅप्स कोणत्याही युजरला फक्त 1 ते 5 हजार रुपये देतात. अशा बनावट अ‍ॅप्स युजर्सना हे देखील आमिष दाखवतात की ते जितक्या वेळा कर्ज अ‍ॅप्सवरून ऑनलाइन कर्ज घेतात तितकी त्यांची मर्यादा वाढेल. त्यानंतर ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्जही घेऊ शकतात. अशा कर्ज अ‍ॅप्सचा वापर करणारे बहुतेक लोक असा युक्तिवाद करतात की या अ‍ॅप्सद्वारे त्यांना 20 ते 30 मिनिटांत कर्ज मिळतं आणि त्यांना बँकांसारख्या कागदपत्रांमधून जावं लागत नाही. त्यामुळंच गरज पडेल तेव्हा ते या अ‍ॅप्समधून पैसे घेतात आणि वेळेवर परतफेड करतात.

लोन अ‍ॅप्सच्या मदतीनं फसवणूक करणाऱ्या टोळ्याही सक्रिय-

यापूर्वीही अशी अनेक प्रकरणं समोर आली होती ज्यात इन्स्टंट लोन अ‍ॅप्सच्या मदतीनं वसुली केली जाते. अशा पद्धतीनं लोकांची फसवणूक करणाऱ्या अनेक गँग अस्तित्वात आहेत. या टोळ्या इन्स्टंट लोन अ‍ॅप्सच्या मदतीनं लोकांना आपला बळी बनवतात. आजच्या युगात अशी मोबाईल अ‍ॅप्स खूप लोकप्रिय झाली आहेत. अशा परिस्थितीत लोक सहजपणे त्याच्या जाळ्यात येतात.अशा टोळ्या बनावट कर्ज योजनेच्या मदतीनं लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांचा वैयक्तिक डेटा चोरतात. याच्या मदतीने त्यांच्याकडून वसुली करण्यात येते.

First published:

Tags: Money fraud, Online fraud, SBI, Sbi alert