मराठी बातम्या /बातम्या /मनी /

विवाहित जोडप्यांसाठी बेस्ट प्लॅन! प्रतिमहा गुंतवा फक्त 200 रुपये अन् दरवर्षी मिळवा 72,000 रुपये

विवाहित जोडप्यांसाठी बेस्ट प्लॅन! प्रतिमहा गुंतवा फक्त 200 रुपये अन् दरवर्षी मिळवा 72,000 रुपये

विवाहित जोडप्यांसाठी बेस्ट प्लॅन! प्रतिमहा गुंतवा फक्त 200 रुपये अन् दरवर्षी मिळवा 72,000 रुपये

विवाहित जोडप्यांसाठी बेस्ट प्लॅन! प्रतिमहा गुंतवा फक्त 200 रुपये अन् दरवर्षी मिळवा 72,000 रुपये

श्रम आणि रोजगार मंत्रालयानं 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन सुरू केली. या योजनेअंतर्गत, विवाहित जोडप्याला दरमहा 200 रुपये गुंतवावे लागतात, ज्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर वार्षिक 72,000 रुपये पेन्शन मिळेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 23 नोव्हेंबर:  तुमचं लग्न झालं आहे का? तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग करत आहात का? तुमचं उत्तर जर होय असं असेल, तर मोदी सरकारची प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन ही अशी योजना आहे जी गुंतवणुकीवर सुरक्षिततेसह चांगला परतावा देऊ शकते. देशातील अनौपचारिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारनं काही वर्षांपूर्वी पेन्शन योजना सुरू केली होती. श्रम आणि रोजगार मंत्रालयानं 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन सुरू केली. या योजनेअंतर्गत, विवाहित जोडप्याला दरमहा 200 रुपये गुंतवावे लागतात, ज्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर वार्षिक 72,000 रुपये पेन्शन मिळेल.

काय आहे प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन योजना?

असंघटित कामगार बहुतेक रस्त्यावर विक्रेते, मध्यान्ह भोजन कामगार, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरकामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर, शेतमजूर, बांधकाम कामगार, विडी उत्पादक, हातमाग कामगार, चामडे कामगार, दृकश्राव्य कामगार आणि इतर तत्सम व्यवसायांत गुंतलेले कामगार आणि ज्यांचं मासिक उत्पन्न 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, तसेच ज्यांचं वय 18-40 वर्षे आहे, असे लोक योजनेसाठी पात्र आहेत. हे श्रमिक नवीन पेन्शन योजना (NPS), कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) योजना किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत येत नाहीत आणि ते कराच्या कक्षेत येत नाहीत.

हेही वाचा: LICनं रिलाँच केले दोन टर्म प्लॅन; पॉलिसीधारकांना मिळणार ‘हे’ फायदे

PM-SYM योजनेत अशा प्रकारे पेन्शन घेता येते?

विवाहित जोडपे 72,000 रुपये वार्षिक पेन्शन कसे मिळवू शकतात हे समजून घेण्यासाठी येथे एक सोपी गणना आहे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती 30 वर्षांची असल्यास, योजनेसाठी मासिक योगदान सुमारे 100 रुपये प्रति महिना असेल – अशा प्रकारे एका जोडप्याचे प्रति महिना योगदान 200 रुपये असेल. अशा प्रकारे, त्या जोडप्याचे वार्षिक योगदान 2,400 रुपये असेल. वयाच्या 60 वर्षांनंतर, जोडप्याला वार्षिक 72,000 रुपये पेन्शन म्हणून मिळतील.

प्रधान मंत्री श्रम योगी मान-धन योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये-

किमान विमा निवृत्तीवेतन: PM-SYM अंतर्गत, प्रत्येक ग्राहकाला 60 वर्षे वय झाल्यानंतर दरमहा 3,000 रुपयांची किमान खात्रीशीर पेन्शन मिळेल. कौटुंबिक निवृत्तीवेतन: निवृत्तीवेतन प्राप्त करताना सदस्याचा मृत्यू झाल्यास, लाभार्थीच्या जोडीदारास लाभार्थ्याला मिळालेल्या पेन्शनपैकी 50% कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून मिळण्याचा हक्क असेल. कौटुंबिक पेन्शन फक्त जोडीदारासाठी लागू आहे.

PM-SYM योजनेसाठी नोंदणी कशी करावी?

ग्राहकाकडे मोबाईल फोन, बचत बँक खाते आणि आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. पात्र सदस्य PM-SYM साठी जवळच्या CSC ला भेट देऊन आणि सेल्फ सर्टिफिकेशनच्या आधारावर आधार नंबर आणि सेव्हिंग अकाउंट नंबरचा उपयोग करून पीएम-एसवाईएमसाठी नोंदणी करू शकतात.

First published:

Tags: Pension