Gold Loan हवंय? SBI देतंय विशेष फिचर्ससह कर्ज

Gold Loan हवंय? SBI देतंय विशेष फिचर्ससह कर्ज

कमीत कमी कागदपत्रं आणि कमी व्याजदरात (Personal Gold Loan) गोल्ड लोन मिळवा.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : सध्याच्या महागाईच्या काळात दैनंदिन किंवा अन्य महत्त्वाच्या गरजेसाठी आपल्याला तातडीनं पैशांची गरज भासते. अशा वेळी अनेक जण पर्सनल लोन किंवा गोल्ड लोन घेण्यास प्राधान्य देतात. यात तुलनेनं गरजूंनी गोल्ड लोन घेण्यास प्राधान्य देणं जास्त सोयीस्कर ठरते. कारण गोल्ड लोनचा (Gold Loan) व्याजदर तुलनेनं कमी असतो आणि परतफेडीसाठी अनेक लवचिक आणि चांगले पर्याय उपलब्ध होतात.

देशातील सर्वात मोठी स्टेट बॅंक आॅफ इंडिया (SBI) ही बॅंक वैयक्तिक गोल्ड लोनची (Personal Gold Loan) सुविधा देते. या माध्यमातून 18 वर्षांवरील सर्व ग्राहकांना 20 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं. तसंच हे कर्ज घेताना उत्पन्नाचा कोणाताही पुरावा सादर करावा लागत नाही. सामान्यतः बॅंका सोन्याच्या शुद्धतेवर आधारित 75 टक्क्यांपर्यंत मूल्य गोल्ड लोन म्हणून देतात.

एसबीआयकडून गोल्ड लोन घेऊ इच्छिणाऱ्यांना 7.50 टक्के व्याजदरासह प्रक्रिया निशुल्क सारख्या योजनांचा लाभ मिळत आहे, अशी माहिती एसबीआयने ट्विटरद्वारे दिली आहे. कमीत कमी कागदपत्रं आणि कमी व्याजदराने सोन्याची नाणी आणि दागिने तारण ठेवून एसबीआय गोल्ड लोनचा लाभ घेता येतो, असे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

हे वाचा - Gold Price Today: जानेवारीपासून 4000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; काय आहे आजचा भाव

एसबीआयकडून गोल्ड लोन घेण्यासाठीचे निकष (Criteria)

वय – 18 वर्षे किंवा त्यावरील व्यक्ती

नोकरी किंवा व्यवसाय - बॅंकेचे कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक तसंच स्थिर उत्पन्न असलेली कोणतीही व्यक्ती पात्र (उत्पन्नाचा दाखला किंवा पुरावा देण्याची गरज नाही)

एसबीआय गोल्ड लोनची वैशिष्ट्ये

कमाल कर्ज रक्कम – 50 लाख रुपये

किमान कर्ज रक्कम – 20 हजार रुपये

मार्जिन

गोल्ड लोन – 25 टक्के

लिक्विड गोल्ड लोन – 25 टक्के

बुलेट रिपेमेंट गोल्ड लोन – 35 टक्के

सुरक्षितता

सोन्याच्या दागिन्यांची गुणवत्ता आणि प्रमाणिकरण व्हेरिफाय केलं जातं.

प्रोसेसिंग फी (Processing Fee)

कर्जाच्या रकमेपैकी 0.25 टक्के जीएसटी किमान 250 रुपये. योनोच्या (YONO) माध्यमातून अर्ज दाखल केल्यास जीएसटी लागू नाही

व्याज दर(Interest Rate)

एमसीएलआर 1 वर्षापेक्षा अधिक कोणत्याही कर्ज रकमेसाठी 0.50 टक्के

अर्जदाराकडून सोने मुल्यांकनाचे शुल्क घेतलं जाईल.

रिपेमेंट मोड(Repayment Mode)

गोल्ड लोन – प्रिन्सिपल रिपेमेंट आणि व्याज आकारणी कर्ज वितरण केल्याच्या महिन्यापासून सुरू होईल.

लिक्विड गोल्ड लोन – ट्रान्झॅक्शन सुविधेसह ओव्हरड्राफ्ट खातं आणि मासिक व्याज लागू केलं जाईल.

बुलेट रिपेमेंट गोल्ड लोन – कर्जाची मुदत किंवा त्यापूर्वी खाते बंद झाल्यावर.

हे वाचा -  सोनं की FD? यंदा या गुंतवणुकीत मिळतोय सर्वाधिक परतावा

रिपेमेंट कालावधी

गोल्ड लोन – 36 महिने

लिक्विड गोल्ड लोन – 36 महिने

बुलेट रिपेमेंट गोल्ड लोन – 12 महिने

गोल्ड लोनसाठी आवश्यक कागदपत्रे

गोल्ड लोनसाठी दोन फोटोग्राफ

ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा

अशिक्षित कर्जदार असल्यास साक्षीदाराचे पत्र

वितरणावेळी आवश्यक गोष्टी

डिपी नोट आणि डिपी नोट डिलिव्हरी लेटर

सोन्याच्या दागिन्यांचे वितरण पत्र

करारपत्र

First published: February 23, 2021, 8:21 AM IST

ताज्या बातम्या