Gold Price Today: जानेवारीपासून आतापर्यंत 4000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; काय आहे आजचा भाव

Gold Price Today: जानेवारीपासून आतापर्यंत 4000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; काय आहे आजचा भाव

जानेवारीपासून आतापर्यंत सोन्याच्या दरात आतापर्यंत जवळपास 4000 रुपये घसरण झाल्याची पाहायला मिळाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा (Gold Price Today) एप्रिलचा फ्यूचर ट्रेड 123 रुपयांच्या तेजीसह 46,320 रुपयांवर पोहचला आहे. त्याशिवाय चांदीचा (Silver Price Today) मार्चचा फ्यूचर ट्रेड 394 रुपयांच्या वाढीसह 69,406 रुपयांवर आहे. जानेवारीपासून आतापर्यंत सोन्याच्या दरात आतापर्यंत जवळपास 4000 रुपये घसरण झाल्याची पाहायला मिळाली आहे.

मागील आठवड्यात गोल्ड दरात 1100 रुपये म्हणजेच 2.3 टक्क्यांची घसरण झाली होती. शुक्रवारी MCX वर वायदा सोनं 46190 प्रति 10 ग्रॅमवर होतं. मागील वर्षातील रेकॉर्ड लेवल 56,200 च्या तुलनेत गोल्ड रेटमध्ये आतापर्यंत 10 हजार रुपयांपर्यंतची घसरण झाली आहे.

दिल्लीत आजचा सोने-चांदी दर -

> 22 कॅरेट गोल्ड भाव - 45420 रुपये

>> 24 कॅरेट गोल्ड रेट - 49450 रुपये

>> चांदीचा दर - 69000 रुपये

(वाचा - GOOD NEWS! येत्या वर्षात अनेक कंपन्या दोन आकडी पगारवाढ करण्याची शक्यता)

आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने दरात तेजी पाहायला मिळाली. अमेरिकेत सोन्याचा दर 1,784.54 डॉलर प्रति औंसवर बंद झाला.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोने-चांदी खरेदी करण्यासाठी हाच काळ चांगला ठरू शकतो. अनेक विषेज्ञांचं म्हणणं आहे की, सोन्याच्या किंमतीत घट झाल्याने मोठी खरेदी होऊ शकते. उच्चांकी स्तरावरून कमी झालेला दर ग्राहकांना आकर्षित करत आहे.

2020 वर्षातील सर्वाधिक वाढीनंतर या वर्षात सोन्याची किंमत कमी झाली आहे. 8 महिन्यांत सोन्याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षाही जास्त किमतीनं कमी झाली आहे. याआधी ऑगस्टमध्ये सोनं तब्बल 56 हजार 200 रुपयांवर पोहोचलं होतं. ऑगस्टनंतर सोनं आता स्वस्त झालं आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: February 22, 2021, 11:30 AM IST

ताज्या बातम्या