नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : भारतात सोन्याला (Gold) मोठी मागणी असते. दागिने बनवण्यासाठी सगळ्यात जास्त सोन्याचाच वापर केला जातो. भारतात सोनं मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. सध्या सोन्याला मोठ्या प्रमाणात भाव असून भविष्यातदेखील भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचबरोबर गुंतवणुकीचा (Investment) सर्वात उत्तम पर्याय म्हणून देखील सोन्याकडे पाहिलं जातं. बँकेतील गुंतवणुकीपेक्षा देखील जास्त परतावा (Return) सोन्याच्या गुंतवणुकीतून मिळतो. कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करण्यापेक्षा आजकाल नागरिकांना सोन्याच्या गुंतवणुकीकडे कल वाढला आहे. कोरोनाच्या संकटकाळातही सोन्यामध्ये 28 टक्के परतावा (Return) मिळाला आहे. त्यामुळे भविष्यात देखील अशाच पद्धतीने फायदा होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी सेन्सेक्समध्ये (Sensex) 16 टक्के तर एफडीवर (FD) 6 टक्के परतावा मिळाला आहे. मोठ्या प्रमाणात सोन्याची मागणी वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात देखील किंमत वाढली आहे. त्यामुळे आणखी भाववाढ होण्याची देखील शक्यता आहे. सोन्याची वाढती मागणी - 2020 या कोरोना वर्षात भारतात सोन्याची आयात कमी झाली आहे. परंतु यावर्षी कोरोना लस आणि इतर गोष्टींमुळे सोन्याची मागणी पुन्हा वाढत आहे. याचबरोबर विविध ऑनलाईन माध्यमातून देखील सोन्यात गुंतवणूक वाढली आहे. यामुळं सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे.
(वाचा - Gold Price Today: जानेवारीपासून 4000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; काय आहे आजचा भाव )
भविष्यातही राहणार मागणी - मागील दहा वर्षांत सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. यामुळे परतावा देखील वाढला आहे. साधारणपणे कोणत्याही बँकेतल्या एफडीवर 5 ते 6 टक्के व्याजदर मिळतो. परंतु त्याच तुलनेत सोन्यात गुंतवणूक केल्यास परतावा मिळतो. त्यामुळे भविष्यात देखील सोन्याची मागणी वाढती राहणार आहे. सॉवरेन गोल्ड फंड गुंतवणुकीला उत्तम पर्याय - मागील काही काळापासून सोन्याची किंमत वाढत असल्याने भविष्यात देखील आणखी किंमत वाढण्याची शक्यता आहे. सॉवरेन गोल्ड फंडमध्ये गुंतवणूक करणं उत्तम पर्याय ठरणार आहे. यामुळे भविष्यात अडीच टक्के परतावा देखील मिळू शकतो.

)







