पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! रांगेत उभं न राहता घरबसल्या जमा करा जीवन प्रमाणपत्र

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! रांगेत उभं न राहता घरबसल्या जमा करा जीवन प्रमाणपत्र

तुम्ही पेन्शनधारक असाल तर जीवन प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक असते, अन्यथा तुमचे पेन्शन बंद होऊ शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर: पेन्शनधारकांसाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र जमा करणं आवश्यक असतं, अन्यथा तुमची पेन्शन मिळण्यात अडथळा येईल. नोव्हेंबरमध्ये हे तुमच्या हयात असण्याचा दाखल अर्थात जीवन प्रमाणपत्र जमा करावं लागतं. ऑफलाइन पद्धतीने लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याचा कालावधी 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत आहे. मात्र ऑनलाइन माध्यमातून तुम्ही कधीही लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकता. सर्टिफिकेट जमा केल्यानंतर वर्षभरासाठी हे जीवन प्रमाणपत्र वैध असते. स्टेट बँक ऑफ इंडियाकडे सर्वात जास्त पेन्शन खाती आहेत (जवळपास 36 लाख) आणि 14 लाख सेंट्रलाइझ्ड  प्रोसेसिंग सेल आहे.

लाइफ सर्टिफिकेट (Life Certificate) अर्थात जीवन प्रमाणपत्र म्हणजे पेन्शनधारक जिवंत असल्याचा पुरावा असतो. पेन्शनधारकांना बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये  जाऊन हे सर्टिफिकेट जमा करावे लागते. मात्र आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्याच हे सर्टिफिकेट जमा करता यावे याकरता ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिली आहे.

लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याची सुविधा एसबीआय कडून देखील ऑनलाइन पद्धतीने देण्यात आली आहे. बँकेने अशी माहिती दिली आहे की याकरता तुम्ही pensionseva.sbi ची साहाय्यता घेऊ शकता.  त्याशिवाय तुम्ही उमंग Appच्या साहाय्याने देखील हे काम करू शकता. आधार सेंटर किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून लाइफ सर्टिफिकेट सबमिट करता येईल. याशिवाय जे पेन्शनर बँकेत जाऊ शकत नाही ते कोणत्याही मॅजिस्ट्रेट किंवा गॅझेटेड ऑफिसरकडून स्वाक्षरी घेऊन लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकतात.

SBIच्या वेबसाइटवरून कसे जमा कराल जीवन प्रमाणपत्र

- एसबीआयच्या  https://www.pensionseva.sbi/  या वेबसाइटवर जाऊन तुमचा युजर आयडी बनवा आणि लॉग इन करा

-पेन्शन अकाउंट नंबरही भरावा लागेल, तसंच जन्मतारिख आणि शाखा क्रमांक टाका. ज्या बँक शाखेत तुमचे पेन्शन येते त्याच शाखेचा क्रमांक तुम्हाला टाकावा लागेल. त्यानंतर मेल आयडी देखील द्या

(हे वाचा-SBI क्रेडिट कार्ड हरवल्यामुळे चिंतेत आहात? ब्लॉक करण्यासाठी वापरा हे 4 मार्ग)

-यानंतर पासवर्ड टाकून तुम्ही अकाउंट क्रिएट करू शकता.

-रजिस्ट्रेशननंतर पेन्शनधारकाच्या मेल आयडीवर मेल येईल. यामध्ये खाते सक्रीय करण्यासाठी एक लिंक दिलेली असेल. त्यावर क्लिक केल्यानंतर खाते Activate होईल.

-यानंतर ईमेल आणि पासवर्ड टाकून वेबसाइटवर लॉग इन करा. याठिकाणी पेन्शन आणि खात्यासंबंधित माहिती येईल.

Umang App च्या माध्यमातून जमा करा जीवन प्रमाणपत्र

-उमंग अ‍ॅपमध्ये Jeevan Pramaan service मध्ये जा. त्यानंतर तुमच्या फोनला बायोमेट्रिक डिव्हाइस कनेक्ट करा

(हे वाचा-60 लाख पेन्शनधारकांसाठी खूशखबर! दिवाळीआधी दुप्पट पेन्शन देण्याच्या विचारात सरकार)

-जीवन प्रमाणपत्र सुविधेअंतर्गत देण्यात आलेल्या General Life Certificate टॅबवर क्लिक करा. याठिकाणी पेन्शन प्रमाणीकरण टॅबमध्ये तुमचा आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक दिसेल. दोन्ही बाबी बरोबर असतील तर जेनरेट ओटीपीवर क्लिक करा.

-त्यानंतर याठिकाणी तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी सबमिट करा. त्यानंतर बायोमेट्रिक डिव्हाइसच्या मदतीन फिंगरप्रिंट स्कॅन करा

-बोटांचे ठसे जुळल्यानंतर तुमचे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार होईल. सर्टिफिकेट पाहण्यासाठी तुम्ही व्ह्यू सर्टिफिकेटवर क्लिक करू शकता. आधार क्रमांकाच्या साहाय्याने सर्टिफिकेट पाहता येईल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 6, 2020, 12:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading