मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पेनी स्टॉकची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल! दीड वर्षात 1 लाखाचे झाले अडीच कोटी

पेनी स्टॉकची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल! दीड वर्षात 1 लाखाचे झाले अडीच कोटी

प्रोसीड इंडिया स्टॉकने (Proseed India Share) सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 26,122 टक्के परतावा दिला आहे. या पेनी स्टॉकची किंमत 19 मे 2020 रोजी 0.36 रुपये होती, जी 18 नोव्हेंबर रोजी बीएसईवर 94.40 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 20 नोव्हेंबर : पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक (Penny Stock Investment) अधिक जोखमीची मानली जाते. मात्र असे काही पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी वेळेत अनेक पटींने पैसे कमावून दिले आहेत. पेनी स्टॉक खूप स्वस्त असतात त्यामुळे त्यात सहज गुंतवणूक करता येते. मात्र अनेकदा निवड चुकल्यामुळे तोटा होण्याचा धोका असतो. मात्र गेल्या काही दिवसात अनेक पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना (Investment Returns) चांगला परतावा दिला आहे.

प्रोसीड इंडिया स्टॉकने (Proseed India Share) सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 26,122 टक्के परतावा दिला आहे. या पेनी स्टॉकची किंमत 19 मे 2020 रोजी 0.36 रुपये होती, जी 18 नोव्हेंबर रोजी बीएसईवर 94.40 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली. Proceed India स्टॉकमध्ये सहा महिन्यांपूर्वी गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम आज 2.62 कोटी रुपये झाली आहे. त्या तुलनेत सेन्सेक्स या कालावधीत 19.50 टक्क्यांनी वधारला आहे.

NPS vs APY: नॅशनल पेन्शन योजना की अटल पेन्शन योजना? कोणती योजना आहे फायदेशीर?

शेअर गुरुवारी 4.99 टक्के खाली शेअर 94.40 रुपयांवर बंद झाला. गेल्या 4 सेशनमध्ये स्मॉल कॅप स्टॉक 18.48 टक्के घसरला आहे. 18 नोव्हेंबर रोजी स्टॉक 4.98 टक्क्यांच्या घसरणीसह उघडला आणि दिवसाच्या ट्रेडिंग सत्रात त्याच पातळीवर अडकला.

फर्मचे मार्केट कॅप 973.22 कोटी रुपयांवर आले आहे. एका महिन्यात स्टॉक 46.5 टक्के घसरला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून प्रोसीड इंडियाचा स्टॉक 24,742 टक्क्यांनी वाढला आहे आणि एका वर्षात तो 31,366 टक्क्यांवर गेला आहे.

मुलांचं सुरक्षित भविष्य आपली जबाबदारी; भविष्यातील गरजांनुसार आजच सुरु करा गुंतवणूक

कंपनीचा व्यवसाय

कंपनी तिच्या स्टेप डाउन सहाय्यक कंपनी ग्लोब 7 पीटीई लिमिटेड (Globe 7 Pte Limited) ला वेब डेव्हलपमेंट, वेब मेंटेनन्स आणि सपोर्ट सर्विस सपोर्ट करते. कंपनी ऑनलाइन अॅडव्हरटायझिंग आणि सिक्युरिटीज अँड डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग या दोन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते.

First published:

Tags: Investment, Money