मुंबई : जर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुमच्या खात्यातून 147 रुपये वजा झाले आहेत का? स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अनेक ग्राहकांच्या मोबाइलवर 147.50 रुपये कपाल्याचा मेसेज आला असेल. हे चार्ज लावण्यामागचं कारण समोर आलं आहे.
नेमकं काय आहे कारण?
तुमच्या खात्यातून कोणत्याही व्यवहाराशिवाय म्हणजेच ऑटो डेबिटशिवाय 147.50 रुपये कापले गेले असतील तर काळजी करण्याचे कारण नाही. खरं तर, बँक आपल्या ग्राहकांकडून वापरल्या जाणाऱ्या एटीएम आणि डेबिट कार्डच्या वार्षिक सेवांवर शुल्क आकारते. एसबीआयने एटीएम आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांच्या खात्यातून 147 रुपये कापले आहेत.
Debit Card : ग्राहकांना मोठा दणका, या बँकेनं वाढवले डेबिट कार्डवरील शुल्क
ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?
एसबीआय आपल्या ग्राहकांकडून एटीएम आणि डेबिट कार्डच्या वार्षिक देखभालीसाठी 125 रुपये चार्ज करते. तसेच ग्राहकांना 18 टक्के जीएसटी त्यावर लागतो. 18 टक्के जीएसटीच्या दराने 125 रुपये मोजले तर ही रक्कम 147.50 रुपये होते. त्याचप्रमाणे एसबीआय एटीएम किंवा डेबिट कार्ड बदलण्यासाठी 300 रुपये आणि 18 टक्के GST आकारला जातो.
क्रेडिट कार्डच्या फीमध्ये देखील बदल
एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडने विविध क्रेडिट कार्डशी संबंधित व्यवहारांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात बदल केला आहे. एसबीआय कार्डने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर 2022 पासून भाडे भरण्याच्या व्यवहारावर 99 रुपये प्रक्रिया शुल्क + लागू केलं आहे.
Agriculture Loan : बळीराजाला अगदी सहज मिळणार कर्ज, SBI ने घेतला मोठा निर्णय
भारतीय स्टेट बँक देशातील सर्वात मोठी आणि सुरक्षित बँक असल्याचं RBI च्या अध्यक्षांनीच म्हटलं होतं. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत बँकेकडे 41.90 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी आहेत. एसबीआयच्या भारतात 22,309 शाखा आणि 65,796 एटीएम/एडीडब्ल्यूएम आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SBI, Sbi ATM, SBI bank, SBI Bank News